सर सैयद अहमद खान लायब्ररीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा**देशभक्ती, संविधानिक जाणीव व बालकांचा उत्स्फूर्त सहभाग*. (रावेर / शेख शरीफ)सर सैयद अहमद खान लायब्ररीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य व सन्माननीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास जळगाव शहरातील मान्यवर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, युवक तसेच मोठ्या संख्येने बालकांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मुजाहिद शेख यांनी अत्यंत शिस्तबद्ध, सुबक व प्रभावी शैलीत केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनामुळे संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.कार्यक्रमाची सुरुवात श्री. नोमान आसिफ मलिक यांच्या पवित्र कुरआन पठणाने झाली. त्यानंतर श्री. अबुबकर इद्रीस शेख यांनी राष्ट्रीय गीत सादर करत उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली.यानंतर खन्सा इद्रीस शेख यांनी सादर केलेली देशप्रेमावर आधारित कविता उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत गौरवली.पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक श्री. अब्दुर्रऊफ शेख यांनी केले.यावेळी वसीम खान साहेब (सामाजिक सेवक) यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता व चांगले नागरिक बनण्याचे महत्त्व समजावून सांगितले.तसेच सलीम इमानदार साहेब यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व स्पष्ट करत संविधानिक कर्तव्ये, देशाच्या प्रगतीमध्ये मुस्लिम समाजाचे सकारात्मक योगदान यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे अध्यक्ष कय्यूम असर साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात 26 जानेवारीचे ऐतिहासिक महत्त्व, भारतीय संविधान, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यावर सविस्तर व मुद्देसूद मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी लायब्ररीचे सचिव अब्दुर्रऊफ शेख गनी साहेब यांनी मुलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान व प्रजासत्ताक दिनाची खरी भावना समजावून सांगत शिक्षण, ज्ञान व जाणीवेचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाच्या समारोपापूर्वी लायब्ररीच्या वतीने उपस्थित सर्व मुलांना चॉकलेट व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.शेवटी मुबश्शिर शेख व इद्रीस शेख यांनी सर्व मान्यवर पाहुणे, नागरिक व आयोजकांचे आभार मानून प्रार्थनेसह कार्यक्रमाची सांगता केली.हा कार्यक्रम केवळ प्रजासत्ताक दिन साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता, मुलांच्या व युवकांच्या मनात देशभक्ती, संविधानिक जाणीव व राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणारा ठरला

सर सैयद अहमद खान लायब्ररीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा**देशभक्ती, संविधानिक जाणीव व बालकांचा उत्स्फूर्त सहभाग*.                                                                     
Previous Post Next Post