रावेर तहसील कार्यालयातून जप्त ट्रॅक्टरची चोरी; रावेर पोलिसांकडून दोन ट्रॅक्टरसह दोघे ताब्यात.. (रावेर (शेख शरीफ)रावेर तहसील कार्यालयाच्या आवारातून अवैध गौण खनिज प्रकरणी जप्त करण्यात आलेले सुमारे ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र रावेर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, अवैध गौण खनिज वाहतूक करत असलेले एम.एच. १९ ए.एन. ४४५२ व एम.एच. १९ पी. ३४४० क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह महसूल विभागाने जप्त केले होते. हे ट्रॅक्टर रावेर तहसील कार्यालयाच्या आवारात उभे करण्यात आले होते.दि. २७ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास, दोन व्यक्तींनी सदर ट्रॅक्टर चोरी करून नेल्याची बाब निदर्शनास आली. याप्रकरणी मंडळ अधिकारी निंभोरा श्री. रवीशंकर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संदीप हिरामण कोळी व महेंद्र पंजाब तायडे (दोघेही रा. सिंगनूर, ता. रावेर) यांच्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर रावेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन लाख ७५ हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर जप्त करून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नकाते (जळगाव), एच.डी.पी.ओ. फैजपूर श्री. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल, पोलीस हवालदार ईश्वर चव्हाण, पोलीस शिपाई प्रमोद पाटील, सुकेस्ट तडवी व श्रीकांत चव्हाण यांनी केली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0