रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर. (.महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती दि.28:- चंद्रपूर राज्यभर १ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान राबविण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा अभियान, २०२६ अंतर्गत दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी चंद्रपूर येथे आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले. सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत म. पो. केंद्र, चंद्रपूर येथे हे शिबिर पार पडले. हे शिबिर","महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था (One Stop Centre) तसेच राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस (कावीळ) नियंत्रण दिन यांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात डॉ. श्रीनिवास कुंभारे, डॉ. विद्या धोबे व त्यांच्या वैद्यकीय पथकाने नागरिकांची विविध प्रकारची आरोग्य व रक्त तपासणी केली. यामध्ये रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, वजन तपासणी, एड्स तपासणी, हार्ट व कॅन्सर प्रोफाइल तसेच विविध आजारांवरील रक्त तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा लाभ ड्रायव्हर, मजूर, टोल नाक्यावरील कर्मचारी, शेतकरी, टॅब परिसरातील गावांचे पोलीस पाटील, सरपंच, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच टॅबवरील अधिकारी व कर्मचारी यांनी घेतला. यावेळी महामार्गावरील दुचाकी, चारचाकी व अवजड वाहन चालकांना वाहन चालविताना हेल्मेट वापरणे, सीट बेल्ट लावणे, वेगमर्यादा पाळणे तसेच इतर वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतात, असे सांगून चालकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमासाठी नंदुरी टोल नाका मॅनेजर प्रवीण चौरे, इंजिनीयर कुणाल बोदे, टोल नाक्यावरील कर्मचारी, ड्रायव्हर, मजूर, शेतकरी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. सदर आरोग्य तपासणी शिबिराची संपूर्ण जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक माया चाटसे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0