दिनांक.7/1/2026 ला अमली पदार्थ विरोधी कार्यदल नागपूर यांचे तर्फे वर्धा जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम ..................................... शासनाने देशात अमली पदार्थाचे निर्मूलन करण्याचा निर्धार केला आहे त्याकरिता जनतेमध्ये सुद्धा अमली पदार्थाचे निर्मूलन व्हावे तसेच अमली पदार्थाचे शारीरिक व आर्थिक नुकसान थांबविण्याकरिता जनजागृती करणेस नागपूर येथील अमली पदार्थ विरोधी कार्यादल चे पोलीस अधीक्षक श्री अजित टिके वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांचे संयुक्त मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सादिक शेख व त्यांचे सहकारी पोलिस हवालदार प्रदीप डोंगरे पोलीस अंमलदार गावंडे यांनीजी. बी. एम. एम. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट येथे ANTF ( नागपूर ) यांच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले कोणीही असा अवैध व्यवसाय जर करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल अशा अटीवर स्वतःचा मोबाईल नंबर त्यांनी सार्वजनिक केला आहे..मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0