पत्रकार दिनानिमित्त ' पत्रकार पद्माकर वासनिक यांचा सन्मान​.. अकोला। आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून मूर्तिजापूर येथील ,,राज्य दैनिक बाळकडू ,,चे पत्रकार पद्माकर वासनिक यांचा वन विभागाने विशेष सन्मान केला. ​वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव), अकोला यांच्या हस्ते पद्माकर वासनिक यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.​या सन्मान सोहळ्यावेळी यशवंत भा. नागुलवार विभागीय वन अधिकारी, (वन्यजीव )विभाग, अकोला,अमित शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी, (वन्यजीव), अकोला, दीपेश लोखंडे वनपरिक्षेत्र अधिकारी, (वन्यजीव), खामगाव, प्रकाश सावळे वनपरिक्षेत्र अधिकारी, (वन्यजीव), बुलढाणा, आदींची उपस्थिती होती.​वन्यजीव संवर्धन आणि जागरूकता क्षेत्रात पत्रकारांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला.

Previous Post Next Post