*नाफेड नियमांच्या नावाखाली शेतकऱ्यांना परत पाठवण्याचा प्रकार....** श्रीकृष्ण रामराव नान्हे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना दिलासा.. (वर्धा जिल्हा विभागीय संपादक:-अब्दुल कदीर) कृषि उत्पन्न बाजार समिती देवळी येथे नाफेडच्या नियमांचा आधार घेत शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीस नकार देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना “सुलतानी संकटग्रस्त व डागेल सोयाबीन” असल्याचे कारण पुढे करून परतीचा रस्ता दाखवण्यात आला. या प्रकारामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. शासनाच्या नाफेड खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने सोयाबीन विक्रीच्या अपेक्षेने शेतकरी मोठ्या आशेने बाजार समितीत दाखल झाले होते. मात्र, प्रत्यक्षात गुणवत्तेच्या नावाखाली शेतमाल नाकारण्यात आल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली. अनेक शेतकरी दूरवरून आलेले असल्याने त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. या गंभीर परिस्थितीत श्रीकृष्ण नान्हे यांनी पुढाकार घेत बाजार समिती प्रशासन व संबंधित खरेदी यंत्रणेशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांनी नाफेडच्या नियमांची योग्य अंमलबजावणी व्हावी, तसेच शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी ठाम भूमिका घेतली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे प्रकरणाला योग्य दिशा मिळाली. श्रीकृष्णा नान्हे यांनी स्पष्टपणे सांगितले की, नैसर्गिक संकटांमुळे काही प्रमाणात डाग पडलेला माल संपूर्णपणे नाकारणे हे अन्यायकारक असून शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच खरेदी प्रक्रिया पार पडली पाहिजे. शेतकऱ्यांच्या श्रमाचे योग्य मूल्य मिळणे आवश्यक आहे, अशी ठाम मागणी त्यांनी मांडली. त्यांच्या प्रयत्नांमुळे संबंधित अधिकाऱ्यांनी फेरविचार करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. यामुळे समस्त शेतकरी बांधवांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. शेतकऱ्यांनी श्रीकृष्ण नान्हे यांच्या भूमिकेचे स्वागत करत आभार मानले. या घटनेमुळे भविष्यात नाफेड खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नाफेड नियमांच्या नावाखाली शेतकऱ्यांना परत पाठवण्याचा प्रकार....** श्रीकृष्ण रामराव नान्हे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना दिलासा..                                               
Previous Post Next Post