महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिन न. प. कर्मचाऱ्यांच्या वतीने साजरा.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क दिन न. प. कर्मचाऱ्यांच्या वतीने साजरा.

पिंजारी माहेमूद
 तालुका प्रतिनिधी: देगलूर 

देगलूर: आज दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी नगर परिषद देगलूर कार्यालयात ज्यामध्ये मा. नगराध्यक्षा सौ विजयमाला बालाजीराव टेकाळे तसेच मा. मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे मॅडम यांच्या सूचनेनुसार नगर परिषद मधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी लोकसेवा हक्क बाबत बित पुढीलप्रमाणे शपथ घेतली...
मी, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो घेते की, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पध्दतीने, विहित कालमर्यादेत व सौजन्याने पात्र नागरिकांना देण्याकामी मला सुपूर्द करण्यात आलेली जबाबदारी पूर्ण प्रमाणिकतेने, निष्ठेने, सचोटीने, संवेदनशीलतेने व तत्परतेने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.
मी सेवा वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होणार नाही, याची काळजी घेईल आणि नागरिकांच्या हक्काचे जतन करण्यासाठी सदैव तत्पर राहील.
वरीलप्रमाणे 'लोक सेवा हक्क शपथ' घेण्यासाठी नगर परिषद देगलूर कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post Next Post