*
खरीप* हंगाम तोंडावर पण कर्जमाफी आणि दोन लाख रुपयांचा निकषाचा पत्ताच नाही
*शेतकऱ्यांना* मात्र बॅंकेचे उंबरवटे झिजवण्याची वेळ
*
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/अनिल चव्हाण
———————————
आता शेतकऱ्यांची जिकडे तिकडे उन्हाळी मशागतिकडे कामाचा वेग धरला असून काही शेतकरी शेतातील ट्रॅक्टरच्या सहाय्याने कामे उरकून घेत आहेत तर एकीकडे हळदी पीक काढणे वेग घेतला आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना पुढील अशा आता खरीप हंगाम जवळ येत असल्यामुळे शासनाने मोठ्या थाटामाटात शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपये पर्यंतची खकर्जमाफी आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपयाची सन्मान निधी जाहीर केला मात्र खरीप हंगाम अगदी उंबरवठ्यावर आलेला असतानाही अशा या घोषणा काय काय कागदावरच राहणार की काय अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे या दोन लाख रुपयांचा मात्र कुणालाही कसा फायदा होणार हे मात्र कळणे कठीण झाले आहे यामुळे ना कर्जमाफी ना लाभ मिळाला पाहायला मिळत आहे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का असा प्रश्न चिंतेत सापडलेला शेतकऱ्यांना पडला आहे पेरणी पूर्वी नियोजनासाठी पैशाची चंचल भासत असल्यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहे खरिपाची हंगामाची पूर्वतयारी म्हणून बियाणे खते आणि मशागतीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या रकमेची गरज आहे शासनाचे एकीकडे जुनी कर्ज थकीत कर्ज भरले जात नाही तोपर्यंत दुसरे पीक कर्ज मिळत नाही यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे
शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहन पर अनुदानाची घोषणा केली असली तरी वाढती महागाई आणि शेतीचा खर्च पाहता हा सन्माननिधी अत्यंत तोगडा असल्याची भावना शेतकऱ्यांना भास होत आहे बऱ्याच शेतकऱ्यांची बोलले जाते की आम्ही नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50 हजाराच्या अनुदान आणि थकबाकीदारांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी हा कसला नियम.
*शासनाने केवळ घोषणा न करता निकष बाजूला सारून खातात पैसे जमा करावेत*
शासनाने केवळ घोषणा न करता सरसकट दोन लाख रुपयांचे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे अन्यथा शेतकऱ्यांची स्वप्न अंधारातच होणार असा शासन कोणता निर्णय कसा घेणार निर्णय घेणार की निकष लावणार असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे पेरणी अगोदर तरी ठोस उपाययोजना कराव्यात याकडे लक्ष आता लागले आहे.
***

