नसरापूर घटनेचा रावेरमध्ये तीव्र निषेध; तहसीलदारांना निवेदन देऊन फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी
(जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे):
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या अमानुष आणि संतापजनक घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ रावेर (जि. जळगाव) येथील विविध सामाजिक संघटना आणि संतप्त नागरिकांनी एकत्र येत रावेर तहसील कार्यालयावर धडक दिली व प्रशासनाला निवेदन सादर केले.
या निवेदनातून नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या असून खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
: या प्रकरणाचा खटला POSCO अंतर्गत फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना लवकरात लवकर कठोर शासन व्हावे.
पीडित कुटुंबाला न्याय: तातडीने आणि संरक्षण मिळवून द्यावे.
राज्यात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी.
"अशा अमानुष घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, हे यातून स्पष्ट होते. सरकारने कठोर पावले उचलून महिलांना सुरक्षित वातावरण द्यावे," असे मत आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आले.
निवेदन देणारे मान्यवर
या प्रसंगी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते,
सौ. संगीता भास्कर महाजन
सौ डॉ योगिता संदीप पाटील
जयंत कुळकर्णी,
पद्माकर महाजन
प्रकाश मुजुमदार,
प्रल्हाद महाजन
सौ. सुवर्णा जे. भागवत रविंद्र पाटील, प्रकाश जोशी
सौ. जयश्री अ. शिंदे यशवंत पाटील, योगीराज पाटील
दिलीप वैद्य, दिलीप कांबळे
डॉ. राजेंद्र पाटील, लखमसी पटेल
किशोर पाटील, योगेश पाटील
व ईतर मान्यवर उपस्थित होते
रावेरमधील या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून, आता शासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

