*आधार अपडेट कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना दिलासा; बोरगव्हान शाळेत उपक्रम उत्साहात संपन्न*
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण
————————————
तालुक्यातील बोरगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेत अक्षय आपले सरकार सेवा केंद्र कॉम्प्युटर्सच्या वतीने 5 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आधार अपडेट कॅम्प यशस्वीरित्या पार पडला. या कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत करण्यात आले असून पालक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या उपक्रमाचे आयोजन सेवा केंद्राचे संचालक तुकाराम पौळ यांनी केले. शाळेतच आधार अपडेटची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना दूरवर जावे लागले नाही, त्यामुळे उपस्थितांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमावेळी ग्रामविकास अधिकारी डि. के. साबळे मॅडम, सरपंच भाऊराव इंगळे, माजी मुख्याध्यापक बजरंग गिलडा, मुख्याध्यापक भारत सवणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायकराव इंगळे, उपाध्यक्ष नागनाथ कदम, ग्रामरोजगार
सहायक रामप्रसाद खुडे, यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कॅम्पमुळे विद्यार्थ्यांचे आधार तपशील योग्यरित्या अद्ययावत झाले असून शैक्षणिक व शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. उपक्रमाच्या यशस्वी उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.
****

