*शालेय स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती साठी आवश्यक*
*@)>सौ. भावनाताई नखाते*
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण
———————————
शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे एन.एम.एम.एस. परीक्षेत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याचा सत्कार.
लिटल चॅम्प ओलंपियाड स्पर्धा परीक्षा आणि एन.एम. एम.एस शिष्यवृत्ती इत्यादी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगती उत्कृष्टपणे करणे शक्य आहे, प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे धडे मिळणे आवश्यक आहे असे प्रतिपादन वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणीच्या सचिव तथा जिल्हा परिषद परभणीच्या माजी उपाध्यक्षा सौ.भावनाताई अनिलराव नखाते यांनी केले.
शांताबाई नखाते विद्यालय पाथरी ता.पाथरी येथे दि. 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभास त्या उपस्थित होत्या याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणीचे प्रशासकीय अधिकारी रोहिदास टेंगसे, सरोदे आर.एस.मुख्याध्यापक यादव एन.ई.डहाळे के.एन. प्राचार्य कांबळे आर.व्ही आदी उपस्थित होते.शांताबाई नखाते प्राथमिक शाळेतील लिटल चॅम्प ओलंपियाड स्पर्धेत 21 विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे या सर्व विद्यार्थ्यांना सुवर्ण तसेच रजत पदके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.शांताबाई नखाते माध्यमिक विद्यालयातील एन एम एम एस परीक्षेत शिष्यवृत्तीधारक झालेला वैभव परमेश्वर पितळे या विद्यार्थ्यांचा पालका समवेत सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक यादव एन. ई. यांनी केले, सूत्रसंचालन बळीराम चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन आसाराम सोनवणे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्य केले कार्यक्रमास पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***

