हिंगणघाट | दिनांक ०१ मे २०२६शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बुद्ध पौर्णिमा या त्रिसंगमाच्या पवित्र औचित्य साधत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा एक प्रेरणादायी उपक्रम हिंगणघाट येथे उत्साहात पार पडला.

हिंगणघाट | दिनांक ०१ मे २०२६
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे महाराष्ट्र दिन, कामगार दिन व बुद्ध पौर्णिमा या त्रिसंगमाच्या पवित्र औचित्य साधत, हिंदुहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा एक प्रेरणादायी उपक्रम हिंगणघाट येथे उत्साहात पार पडला.

  वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा 

पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली “८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण” या बाळासाहेबांच्या विचारसरणीला अनुसरून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच्या सूचनांनुसार, आज सकाळी साडेआठ वाजता हिंगणघाट येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उद्योग राज्यमंत्री तथा माजी आमदार व वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना नेते मा. श्री. अशोक भाऊ शिंदे यांच्या हस्ते, जिल्हाप्रमुख श्री. राजेंद्र खूपसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख श्री. राजेंद्र खूपसरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना संघटन बळकटीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले, तर मा. अशोक भाऊ शिंदे यांनी सांगितले कि शहर व ग्रामीण च्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाचे प्रत्येक शिवसैनीक ,पदाधिकाऱ्यांनी जनसंपर्क कार्यालयातून आपला सहभाग दिलाच पाहिजे. जनता या सत्ताधारी लोकांपासून त्रस्त झाली आहे. तसेच पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी कसे सक्रिय राहावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
यानंतर, हिंगणघाट नगरी ही कामगारांची नगरी असल्याची जाणीव ठेवत, महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने शहरातील गिरणी कामगारांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. एडवोकेट श्री. मुरली मनोहर व्यास यांच्या अध्यक्षतेखाली मा. अशोक भाऊ शिंदे, जिल्हाप्रमुख श्री. राजेंद्र खूपसरे, उपजिल्हाप्रमुख श्री. सतीश धोबे, तालुकाप्रमुख श्री. मनीष देवडे, माजी नगराध्यक्षा सौ. सुधाताई शिंदे, नगरसेविका सौ. राजश्री देवडे व माजी जिल्हा संघटिका सौ. करूनाताई वाटकर यांच्या उपस्थितीत गिरणी कामगार सर्वश्री रशीद खा पठाण, केशव कृष्णाजी गिदेंवार, गुलाब देवराव वरवटकर, दिवाकर रामाजी भोयर व सुनील दंमडुजी निंमसोलकर यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच पिंपळगाव येथील युवक सर्वश्री गणेश शंकरराव राऊत, श्री रोहन अशोकराव बनसोड, गजानन शंकरराव मलातपुरे, रमाकांत नारायण घ्यारे, प्रमोद मनोहरराव ढगे उमेश मारोतराव सुरसे व  मोठया संख्येने शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधत भगव्या विचारांना साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाप्रमुख श्री. मनीष देवडे यांनी केले, तर प्रास्ताविक जिल्हाप्रमुख श्री. राजेंद्र खूपसरे यांनी केले. आणि आभारप्रदर्शन प्रकाश अनासाने यांनी केले.बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त २३ जानेवारी २०२७ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर रूपरेषा सादर केली.
आपल्या भाषणात मा. अशोक भाऊ शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी अधोरेखित करताना विशेषतः पारधी समाजाच्या समस्या मांडल्या. त्यांच्या जन्मनोंदणीअभावी आधारकार्ड व इतर शासकीय सुविधांपासून वंचित राहणाऱ्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.बाळासाहेबांच्या राजकीय प्रवास आणि त्यानी मुंबई तसेच संपूर्ण महाराष्ट्रात व देशात आपल्या दृदशक्तीने नाव लौकीक केले त्याबद्दल ची माहिती नवीन पिढ्याला पुन्हा सांगण्याची हि काळाची गरज आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे व्यक्ती नसून तरुण पिढी साठी तसेच मराठी लोकांसाठी विचार आहे. नैराश्यातून प्रकाशाकडे जाणार मार्ग म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आहे. तसेच समाजविघातक प्रवृत्तींना कठोर उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त करत, शिवसैनिकांनी अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरायला सदैव सज्ज राहावे, असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात एडवोकेट श्री. मुरली मनोहर व्यास यांनी शिवसेनेच्या परंपरेची आठवण करून देत, तरुणांनी पुढे येऊन संघटन अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली.या खोटरड्या सत्ताधारी लोकांचे कासरे फक्त शिव सेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष धरून जाग्यावर आणू शकतो.
कार्यक्रमाचा समारोप उपतालुकाप्रमुख श्री. प्रकाश अनासाने यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री शंकर मोहमारे, श्रीधर कोटकर,गजानन काटवले, प्रविनजी राऊत, शांतारामजी मोरकुटे,सतीश ढोमने, शुभम सोरटे,दिनेश धोबे, नितीन वैद्य, भोला चव्हाण, सचिन पोटदुखे,प्रमोद एडलावर, अविनाश धोटे, अनंता गलांडे, संजय पिंपळकर,भास्कर ठवरे, हिरामण आवारी, नरेंद्र गुलकरी,भास्कर मानकर,सुधाकर अराडे ,दिलीप चौधरी,लक्ष्मण बकाने, विनोद मोहड,अक्षय ठाकूर, प्रमोद खळतकर,अमोल वादाफळे ,प्रकाश भुसारी,गणेश वडुले,विलास ढोबळे, राजू कापकर, विजय अष्टांनकर,सुरेश लडी,भोला ठाकूर, सुरेश चौधरी, गुणवंतजी वानखेडे, प्रशांत कांबळे, नारायणराव घायरे,पप्पू घावघवे,निलेश भगत, आशिष वाघ,प्रशांत सुपारे, चंद्रशेखर भोयर,विकास दाणी, हेमंत भोयर, संजय तराळे,नानाजी ठोंबरे,लक्ष्मण कापकर,सचिन वावधने, अनिल मुन,बलराज डेकाटे,राजू तपासे,हरीश गुंडे, देवा मलय,संजय चावरे,बबलू राऊत,आदी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
Previous Post Next Post