मैत्रीची माणुसकी: पत्रकार मित्राच्या मदतीला धावले ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कदीर

मैत्रीची माणुसकी: पत्रकार मित्राच्या मदतीला धावले ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कदीर

वर्धा/सावंगी: जिल्हा विभागीय प्रतिनिधी -राजू कांबळे

पत्रकारिता क्षेत्रात केवळ बातम्यांचेच नाते नसते, तर संकटाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचे संस्कारही जपले जातात. याचाच प्रत्यय नुकताच सावंगी येथे आला. पुलगाव येथील अवनी 'एंटरप्राइजेस'चे संचालक आणि सक्रिय पत्रकार विपुल पाटीलयांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कदीर यांनी गिरडवरून थेट सावंगी गाठून आपल्या मित्राला आधार दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, विपुल पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून दातांचा त्रास जाणवत होता. या त्रासाचे स्वरूप गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी सावंगी येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही वार्ता गिरड येथील त्यांचे स्नेही ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कदीर यांना समजताच, त्यांनी कोणताही विलंब न लावता तातडीने सावंगी रुग्णालय गाठले.
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत!
अब्दुल कदीर यांनी रुग्णालयात जाऊन विपुल पाटील यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची सविस्तर विचारपूस केली. केवळ भेटच घेतली नाही, तर घाबरू नका, आम्ही सर्व पत्रकार मित्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास देत त्यांना मानसिक बळ दिले. पाटील हे लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
> "संकटाच्या काळात मित्रच मित्राच्या कामात येतो. विपुल पाटील हे केवळ एक व्यावसायिक नसून आमचे अत्यंत जवळचे पत्रकार मित्र आहेत. त्यांच्या कठीण काळात त्यांना भेटणे आणि दिलासा देणे हे माझे कर्तव्य होते.
> अब्दुल कदीर, ज्येष्ठ पत्रकार, गिरड. 
या भेटीमुळे विपुल पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे. पत्रकारितेच्या धावपळीच्या जगात जपलेली ही मैत्री आज सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
Previous Post Next Post