हिंगणघाट नगर पालिका प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक श्री. रोहित हांडे व नगरसेविका सौ. शीतल अमोल बोरकर यांनी नागरिकांच्या वतीने मांडलेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत आज 14/6/2026 ला तातडीने प्रभाग क्रमांक ९ मध्ये सावस्त सभापती संजय माडे पाहणी करताना.
मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
दोन तोंडी नाल्याजवळील पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे मोठ्या नाल्यात मिळणाऱ्या छोट्या नाल्याचा प्रवाह बंद करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी भूमिगत गटाराच्या चेंबरचे नुकसान झाल्याने परिसरातील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्रत्यक्ष पाहणी केल्यादरम्यान समस्येची तातडीने दखल घेत नगर परिषद बांधकाम विभागाचे अभियंता श्री. अली साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती देण्यात आली व आवश्यक उपाययोजना त्वरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्याचा प्रवाह सुरळीत राहणे अत्यंत आवश्यक असून पाणी साचून नागरिकांच्या घरांमध्ये शिरू नये यासाठी तीन दिवसांच्या आत मुख्य नाल्याची भिंत पूर्ण करणे तसेच बंद करण्यात आलेल्या छोट्या नाल्याचा प्रवाह पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागास देण्यात आले आहेत.
लवकरच नाल्याचा प्रवाह सुरू होत असल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगर परिषद प्रशासनाशी सतत समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

