वादळी वार्यामुळे शेतकर्यांचे सोलारचे नूकसान*
——————
*
मानवत परभणी विभागीय संपादक/ अनिल चव्हाण
मानवत तालूक्यात दिनांक १२ जून रोजी
वादळी वारे व पाऊस झाला तर सोसायट्याच्या वादळी वाऱ्यामुळे शेतकर्यांचे सोलार पंपाचे नुकसान झाले त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
मानवत तालूक्यातील मौजे नागरजवळा येथील रहिवासी शेतकरी सुखदेव तुकाराम होगे यांचे शेत ईटाळी शिवारात असून शेत गट सर्व्हे नंबर 43 असून दिनांक १२ जून रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे सोलार पंप व सोलार पॅनलचे मोठ्या प्रमाणात अर्थीक नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांतून व्यक्त केल्या जात आहे.
***

