जागरूक जनता, सकारात्मक राजकारणी व तत्पर प़्रशासन...
अखेर बुलडोजर चालला.
(भद्रावती चंद्रपूर जिल्हा विभागीय संपादक महेश निमसटकर)
मूल.दि. 25:_ सार्वजनिक समस्येवर
शहरवासीयांची जागरुकता, राजकारण बाजूला सारून राजकीय पक्षांची सकारात्मकता व तेवढयाच तत्परतेने न. प. प़शाशनाने " जरा हटके"
केलेली कायॅवाही अशा उत्तम दाखल्याची अनुभूती मूल शहरात
घडली. अखेर नगरपरिषदेच्या अधिकारात असलेल्या सावॅजनिक
जागेवर करण्यात आलेल्या मोठ्या
अतिक्रमणावर न. प. प़शाशनाने
बुलडोजर चालविला व न. प. प़शाशन जनहिताची बांधिलकी
जोपासता हे दाखवून दिले.
मूल शहरात अद्यावत आठवडी बाजाराचे कडेला ( जूने
गोडी विहीरगाव क्षेत्र) न. प. मालकीच्या
भूमापन क्षेत्र 71 वर गत अनेक
वषाॅपासून बेकायदेशीर खरेदी विक्री झाल्याची व यात मोठे
व्यवसायीक गाळ्याचे अवैध बाधकाम
शहरवासीयांनी शोशल मिडीयावर
चचैत आणले. अनेक जागरूक नागरिकांनी चचैत सहभागी होऊन
या सावॅजनिक समस्येला प़शाशना
समोर ठेवले. 17व18 जून ला विषय समोर येऊन खमंग चचैत राहीला. न. प. प़शाशनाने कागदपत्रांचा अभ्यास
करून दि. 22 जून ला सदर अवैध
बांधकामकत्याॅस तिन दिवसात बांधकाम पाडण्याची सुचना करून
बांधकाम थांबविले.
सदर बांधकाम थांबले पण निव्वळ बांधकाम थांबवून चालणार नाही
या झालेल्या मोठ्या बांधकामावर
बुलडोजर चालवून अशा बेकायदेशीर भविष्यातील हरकतींना आळा बसावा याकरीता न. प.
विरोधी पक्ष असलेल्या भाजपा तफै
भा. ज. यु. मो. ने निवेदन देऊन
सुरज मांदाडे उपाध्यक्ष भा. ज. यु. मो. यांचे नेतृत्वात आघाडी उघडून
सकारात्मकता दाखवून दिली.सदर
प़भागाचे भा. ज. पा. नगरसेवक नितीन गददेवार
यांनीही या संबंधाने न. प. कडे
सकारात्मक
पाठपुरावा केला होता.
अखेर नगरवासियांची जागरूकता, विरोधी पक्षांची सकारात्मकता यांचा सन्मान करीत
कायॅवाहीकरीता तयार असलेल्या न. प.
मुख्याधिकारी संदिप दोडे व सहकारी अधिकाऱ्यांनी तत्परतेने
दि. 25 जून ला सदर पक्के बांधकाम
जेसीबी लावून पोलीस बंदोबस्तात
भुईसपाट केले. एवढेच नाही तर
या भूमापन क़. 71 वर वसलेल्या
इतर अनेक अतिक्रमण धारकांना सुद्धा नोटीस बजावण्यात आले आहे.
जनतेची सावॅजनिक हिताची
मागणी, राजकारणा बाहेर विरोधी
पक्षांची सकारात्मकता व शहर हिताथॅ न. प. प़शाशनाने त्वरीत
घेतलेली दखल, ही एकसूत्रता मात्र
नजरेत भरण्याजोगी तेवढीच इतरही शहरांसाठी अनुकरणीय
असल्याचे मत व्यक्त केले जात
आहे.
्

