दहावीनंतर थेट इंजिनिअरिंग ते जागतिक दर्जाचे करिअर; तळसंदेतील डी. वाय. पाटील विद्यापीठ ठरतेय विद्यार्थ्यांची पहिली पसंती!"* *उद्योगाभिमुख शिक्षण, आधुनिक सुविधा आणि शंभर टक्के करिअरकेंद्री दृष्टीकोनामुळे विद्यार्थ्यांसाठी तळसंदेचे डी. वाय. पाटील विद्यापीठ ठरत आहे विश्वासार्ह शैक्षणिक केंद्र."*

*"दहावीनंतर थेट इंजिनिअरिंग ते जागतिक दर्जाचे करिअर; तळसंदेतील डी. वाय. पाटील विद्यापीठ ठरतेय विद्यार्थ्यांची पहिली पसंती!"*

 *उद्योगाभिमुख शिक्षण, आधुनिक सुविधा आणि शंभर टक्के करिअरकेंद्री दृष्टीकोनामुळे विद्यार्थ्यांसाठी तळसंदेचे डी. वाय. पाटील विद्यापीठ ठरत आहे विश्वासार्ह शैक्षणिक केंद्र."* 

*(तळसंदे : प्रतिनिधी*)

बदलत्या जागतिक शैक्षणिक आणि औद्योगिक गरजांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तळसंदे येथील डी. वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध आधुनिक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. यंदा डिझाईन, कायदा शिक्षण तसेच दहावीनंतर थेट अभियांत्रिकी पदवी देणारा सहा वर्षांचा इंटिग्रेटेड इंजिनिअरिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती प्रवेश प्रक्रिया संचालक प्रा. डॉ. शंकर पुजारी यांनी दिली.

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता आणि कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाची शैक्षणिक, संशोधन आणि कौशल्य विकास क्षेत्रातील यशस्वी वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाकडून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.

"आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्ये, संशोधनवृत्ती, नेतृत्वगुण आणि उद्योग क्षेत्राशी सुसंगत ज्ञान विकसित होणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन डॉ. पुजारी यांनी केले. याच दृष्टीने विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांची रचना केली आहे.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेत कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, डेटा सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यांसारखे आधुनिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, ऑटोमेशन आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेला सहा वर्षांचा इंटिग्रेटेड बी.टेक. (डिप्लोमा + डिग्री) अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कमी कालावधीत तांत्रिक शिक्षणासोबतच उद्योग क्षेत्रातील अनुभव मिळवून देणार आहे. त्यामुळे अभियंता बनण्याचे स्वप्न अधिक सुलभ होणार आहे.

व्यवस्थापन क्षेत्रात बीबीए, एमबीए, अॅग्री-बिझनेस मॅनेजमेंट, एमबीए (फार्मास्युटिकल मॅनेजमेंट) तसेच ग्लोबल एमबीए हे अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना व्यवस्थापन, उद्योजकता आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी मिळणार आहे.

कायदा क्षेत्रात बी.ए. एल.एल.बी. आणि एल.एल.बी., तर संगणक क्षेत्रात बीसीए व एमसीए अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सर्जनशील क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी बॅचलर ऑफ डिझाईन अंतर्गत व्हिज्युअल कम्युनिकेशन, यूआय/यूएक्स, अॅनिमेशन, प्रॉडक्ट डिझाईन तसेच इंटिरिअर अँड स्पेस डिझाईन यांसारखे अभ्यासक्रम नव्या युगातील करिअरच्या दालनांची दारे खुली करत आहेत.

याशिवाय बी.एस्सी. डेटा सायन्स, एम.एस्सी. ऑर्गेनिक केमिस्ट्री, अॅनालिटिकल केमिस्ट्री आणि फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांसारखे आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम संशोधन आणि उद्योग क्षेत्रातील संधींसाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवत आहेत.

विद्यापीठामध्ये आधुनिक प्रयोगशाळा, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्राशी सहकार्य, इंटर्नशिप, प्लेसमेंट सहाय्य, संशोधनाच्या संधी तसेच क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला जातो. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विविध मेरिट स्कॉलरशिप योजनाही उपलब्ध आहेत.

करिअरला योग्य दिशा देणारे शिक्षण, कौशल्याधारित प्रशिक्षण आणि जागतिक स्तरावरील संधी मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी डी. वाय. पाटील ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, तळसंदे येथे भेट देऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन डॉ. शंकर पुजारी यांनी केले आहे.
Previous Post Next Post