शिक्षणाचा खेळखंडोबा**मानवत तालूक्यातील कोल्हा जिल्हा परिषद शाळेला पालकांनी पहिल्या दिवशीच ठोकले कूलूप*——————

*शिक्षणाचा खेळखंडोबा*
*मानवत तालूक्यातील कोल्हा जिल्हा परिषद शाळेला पालकांनी पहिल्या दिवशीच ठोकले कूलूप*
——————
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.


आज दिनांक १५ जून रोजी नविन शैक्षणिक वर्ष जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने परभणी जिल्हातील सर्वच शाळामध्ये शालेय मुलांच्या स्वागताने  सूरू झाले. पण मानवत तालूक्यातील कोल्हा जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी केंद्रीय प्राथमिक शाळा कोल्हा या शाळेला सुज्ञ व जागृक पालकांनी आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी आपल्या मागण्यासाठी शाळेला पहिल्याच दिवशी कुलूप ठोकून शिक्षकांचे व शिक्षण विभागाचे स्वागत केले गेल्या शैक्षणिक वर्षात मुख्याध्यापकाच्या मनमानी कारभारा बद्दल त्यांच्या बदलीसाठी व एक शिक्षक कायम गैरहजर असल्या बाबत मागील सहा सात महिन्यापासून वारंवार तक्रारी करून ही प्रशासनाने बदली केली नाही.
एवढे असून ही पहिल्याच दिवशी शिक्षक हजर झाला नाही म्हणून सुज्ञ पालकांनी आणि शिक्षणप्रेमी नागरीकांनी शाळेला पहिल्या दिवशी कुलूप ठोकले आहे. 
त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. शिक्षण विभागाला निवेदन देऊन तक्रार दाखल केली.


***
Previous Post Next Post