कर्तुत्वाला सलाम ! सभासद हितासाठी आयुष्यभर झटलेल्या उदय बापू पाटील यांचा सेवापूर्ती गौरव.

कर्तुत्वाला सलाम !
 सभासद हितासाठी आयुष्यभर झटलेल्या उदय बापू पाटील यांचा सेवापूर्ती गौरव.

(महाराष्ट्र राज्य कार्यकारी संपादक जाकीर तडवी रावेर)

जळगाव, दि. 26 (प्रतिनिधी):
राजे संभाजी नाट्यगृह, जळगाव येथे ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष तसेच जळगाव महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि सहकार गटाचे प्रमुख श्री. उदय (बापू) पाटील यांच्या सेवापूर्तीप्रित्यर्थ भव्य सत्कार समारंभ उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित दादा तांबे, आमदार राजू मामा भोळे, जळगाव महापौर दीपमाला काळे, रोहित निकम, एस. एस. अण्णा पाटील, व्ही. झे. बापू पाटील, शिक्षक नेते एस. डी. भिरुड सर, संभाजी अप्पा पाटील, भाऊसाहेब आर. एच. बावीस्कर, जुक्टो संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याशिवाय ग.स. सोसायटीचे आजी-माजी संचालक, जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे विद्यमान संचालक मंडळ, जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक पतपेढी भुसावळचे संचालक मंडळ तसेच सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री. उदय बापू पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव केला. ग.स. सोसायटीच्या सभासद हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबविणे, संस्थेला कर्जमुक्त करण्यासाठी केलेले प्रयत्न, तसेच महानगरपालिकेत विविध पदांवर कार्यरत असताना नागरी सुविधांच्या विकासासाठी दिलेले योगदान याचा विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांच्या प्रामाणिक, लोकाभिमुख आणि कार्यक्षम सेवेमुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केल्याचे मान्यवरांनी सांगितले.

याप्रसंगी जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीच्या वतीने अध्यक्ष शैलेश राणे, उपाध्यक्ष तुषार बोरसे, सचिव डी. एस. पाटील, खजिनदार अजय पाटील, संचालिका वैशाली महाजन व सोनम पाटील, तसेच संचालक जे. पी. सपकाळे, संदीप घुगे, जगदीश पाटील, सिधेश्वर वाघुळदे, भावेश अहिरराव, आबा पाटील, संजय सांगळकर, डिगंबर पाटील, हेमंत चौधरी, सचिन पाटील, संजय सोनवणे, भगतसिंग पाटील, संजय निकम, डी. ए. पाटील, मनोहर सूर्यवंशी, तज्ञ संचालक आर आर धनगर सर,आर. एन. महाजन आणि सुनील महाजन यांनी श्री. उदय बापू पाटील यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची प्रतिमा, शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार केला.

हा सेवापूर्ती समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, श्री. उदय बापू पाटील यांच्या प्रदीर्घ व समाजहिताच्या कार्याला उपस्थित मान्यवरांनी मनःपूर्वक सलाम केला.
Previous Post Next Post