मृद व जलसंधारण उपविभागात लिपिकाने ८६ लाख पाण्याप्रमाणे जिरवून अपहार केला. वरिष्ठांचे लिपिकाच्या कामकाजाकडे दुर्लक्ष.

मृद व जलसंधारण उपविभागात 
लिपिकाने ८६ लाख पाण्याप्रमाणे जिरवून अपहार केला. 

वरिष्ठांचे लिपिकाच्या कामकाजाकडे दुर्लक्ष.

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल दि.२६ 
शासकीय वेतन प्रणालीचा पद्धतशीरपणे सोयीनुसार वापर करून शासनाच्या तिजोरीतून 86 लाख रुपये जिरवून मोठा आर्थिक अपहार केल्याचे समोर आल्याने शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

सदरचा धक्कादायक पैसे खाण्याचा प्रकार मंत्री महोदय सावकारे यांच्या शहरातील भुसावळ येथे उघडकीस आल्याने राजकारणात सुद्धा मोठी खळबळ उडाली.
भुसावळ येथील मृद व जलसंधारण उपविभागातील वरिष्ठ लिपिकाने 'सेवार्थ' प्रणालीत फेरफार करून सुमारे ८६ लाख ८ हजार ६४३ रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की मृद व जलसंधारण उपविभागातील लिपिक तनुज रवींद्र सैंदाणे (वय ३५, रा.पवन हिल्स, जळगाव) याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या शासकीय अपरामुळे जिल्ह्यात शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

संबंधित लिपिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन बिले तयार करणे,पूरक देयके सादर करणे तसेच कोषागाराशी संबंधित कामकाजाची जबाबदारी पार पाडत असताना त्याने आपल्या पदाचा आणि अधिकाराचा स्वतःसाठी दुरुपयोग करून त्याने फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२६ या कालावधीत ‘सेवार्थ’ प्रणालीत स्वतःच्या मूळ वेतनासह विविध भत्त्यांमध्ये नियमबाह्य वाढ करून घेतली.

या फेरफारच्या आधारे तयार केलेली वेतन बिले खरी असल्याचे भासवून ती आहरण व संवितरण अधिकारी उपअभियंता निनाद
रत्नपारखी यांच्या स्वाक्षरीसाठी सादर करण्यात आली.त्यानंतर ही बिले भुसावळ कोषागार कार्यालयात सादर करून संशयिताने ७० लाख ३८ हजार ३७ रुपये स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतल्याचे समोर आले  आहे.

याप्रमाणे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आणि इतर कपातीच्या रकमेतही फेरफार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आले आहे. लिपिकाने अशाप्रकारे सुमारे १५ लाख ७० हजार ६०६ रुपये स्वतःच्या निवृत्त वेतन खात्यात जमा केल्याचे फिर्याद मध्ये म्हटले आहे.त्यामुळे शासनाची एकूण ८६ लाख ८ हजार ६४३ रुपयांची आर्थिक फसवणूक /अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.उपअभियंता निनाद विवेक रत्नपारखी ( वय ३२, रा. आदर्श नगर, जळगाव ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २५ जून रोजी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Previous Post Next Post