पत्रकारांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी; फैजपूर येथे निवेदन* _*महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, वाईस ऑफ मीडिया व फैजपूर मराठी पत्रकार संघ प्रशासनाला निवेदन*_

*पत्रकारांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी; फैजपूर येथे निवेदन* 

 _*महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, वाईस ऑफ मीडिया व फैजपूर मराठी पत्रकार संघ प्रशासनाला निवेदन*_ 

सावखेडा ता.रावेर प्रतिनिधी :

ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी संवादादरम्यान कथितरीत्या आक्षेपार्ह भाषा वापरून धमकी दिल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (मुंबई), वाईस ऑफ मीडिया, फैजपूर पत्रकार संघटना तसेच परिसरातील पत्रकारांच्या वतीने करण्यात आली.

सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी पत्रकारांनी काळ्या फिती बांधून या घटनेचा निषेध नोंदविला. पत्रकारांच्या हितरक्षणासाठी घोषणा देत फैजपूर येथील प्रांताधिकारी बबनराव काकडे यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच या निवेदनाच्या प्रती फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) कार्यालय तसेच सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांनाही निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे, लोकप्रतिनिधींना जाब विचारणे आणि वस्तुनिष्ठ माहिती समाजापर्यंत पोहोचवणे हे पत्रकारांचे मूलभूत कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांविषयी कथित अपमानास्पद भाषा वापरणे किंवा धमकी देणे हे निषेधार्ह असून त्यामुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही बाधा पोहोचू शकते, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर आवश्यक ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करावी. तसेच राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनावेळी उपस्थित पत्रकार :
संतोष  नवले, योगेश  सैतवाल, दिलीप वैद्य, राजीव बोरसे, मिलिंद टोके, प्रमोद कोंडे, दिलीप भारंबे , फारुख शेख अमीर, अजहर खान अजमल खान, प्रदीप  कुलकर्णी, राजेश  चौधरी, मलिक मलिक मुसा, प्रकाश  पाटील, नजमोद्दीन शेख मुनीर, युनूस पिंजारी, पी. के. चौधरी, संतोष  बारी, , कैलास  लवंगडे, संजय  बारी, भूषण सोनवणे, किरण  पाटील, इस्माईल पिंजारी, शेख फरीद शेख नुरोद्दीन, युसुफ शाह सुपडू शाह, ललित चौधरी, जुम्मा तडवी, राजू तडवी, सलीम पिंजारी, ललितकुमार  फिरके यांच्यासह परिसरातील अनेक पत्रकार उपस्थित होते.
Previous Post Next Post