उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे ०७ रुग्णांवरती मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न.

उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे ०७ रुग्णांवरती मोतीबिंदू शस्त्रक्रिया संपन्न.

पिंजारी माहेमूद 
तालुका प्रतिनिधी: देगलूर 

देगलूर: दिनांक १३ जून२०२६रोजी माननीय जिल्हा शल्यचकित्सक डॉक्टर पेरके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश देवणीकर यांच्या देखरेखी खाली उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे आज ०७ रुग्णांवरती मोतीबिंदू च्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.. मोतीबिंदू शिबिरामध्ये उप जिल्हा रुग्णालय देगलूर येथील नेत्र शल्य चिकित्सक डॉ नाईक व नेत्र शल्य चिकित्सक डॉ लखमावार यांनी सदरच्या शस्त्रक्रिया केल्या ... सदरच्या शस्त्रक्रिया शिबिरामध्ये भुलतज्ञ म्हणून डॉक्टर अनिल थडके यांनी काम केलं त्याचप्रमाणे ओटी इन्चार्ज मोमिन
सिस्टर, शिवाजी पवार ब्रदर .. ... नेत्राधिकारी कसबे तसेच .. ओटी असिस्टंट जमील आणि उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.... अशा प्रकारच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे दर महिन्याच्या प्रत्येक शनिवारी करण्यात येणार आहे... तसेच कुटुंब कल्याण स्त्री शस्त्रक्रिया, सीजेरीयन शस्त्रक्रिया, अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसील, शरीरावरील विविध गाठी इत्यादी शस्त्रक्रिया दर मंगळवारी करण्यात येते... तरीही वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश देवनीकर यांनी सदर शिबिराचा लाभ घेण्यासाठी गरजूंनी उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे संपर्क साधावा व सदर शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले....
Previous Post Next Post