मनसे पक्ष अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस अकोला जिल्ह्यात मोठ्या आनंद उत्साहात साजरा .......
*( अकोला मुख्य जिल्हा प्रतिनिधि इमरान खान*)
अकोला -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला जिल्ह्यात विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.संपर्क अध्यक्ष हेमंतजी गडकरी यांच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यात वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शालेय वह्या पुस्तके वाटप करण्यात आले. सर्व तालुक्यातील सरकारी रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्याचा कार्यक्रम करण्यात आले. अकोल्याचे आराध्य दैवत राज राजेश्वर महाराज यांना दुग्ध अभिषेक करण्यात आले. बाळापुर तेल्हारा हिवरखेड मनसेतर्फे फळ वाटप सदस्या नोंदणी अभियान राबवून शहरात मनसेमय वातावरण करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कराळे, शहर उपाध्यक्ष अविनाश मुरेकर, प्रसिद्धी प्रमुख प्रेम पाटील मगर,राहुल माळी, राहुल साबळे, सोनू बानोरकर, हिवरखेड चे पदाधिकारी तालुका अध्यक्ष पवन नेरकर, राहुल कराळे, गब्बर भाई, इत्यादी मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते तेल्हारा तालुका प्रभारी कुशल देव प्रमोद घोगले, गावंडे मलीयेयांनी तेल्हारा कार्यक्रमाचे आयोजन केले.बाळापूरचे शहर अध्यक्ष श्याम किल्लेकर यांनी वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.
---------------------

