*हिंगणघाटचा ऐतिहासिक डंका! आयआयटी ॲडव्हान्स परीक्षेत 'सुपर सेव्हन'ची 'ना भूतो ना भविष्यती' कामगिरी;*
(मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक )
हिंगणघाट:
नुकत्याच पार पडलेल्या जगातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या 'आयआयटी ॲडव्हान्स' (IIT-JEE Advanced) परीक्षेत हिंगणघाट शहरातील ७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून एक नवा इतिहास रचला आहे . विनीत मनोहरे, असित म्हैस्के, पीयूष म्हैस्के, सांची रिंगणे, श्रावणी अंबुलकर, श्रेया बुरड आणि ओम हांडे या 'सुपर सेव्हन' शिलेदारांनी मिळवलेले हे यश हिंगणघाट शहरासाठी 'ना भूतो ना भविष्यती' असेच आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी अत्यंत बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, गरिबीच्या भिंती चिरडून हे उत्तुंग शिखर गाठले आहे. या यशाचे मानकरी असणारे विनीत मनोहरे, सांची रिंगणे आणि ओम हांडे हे तिघेही इयत्ता दहावीपर्यंत साध्या शाळेचे विद्यार्थी राहिले आहेत.परिस्थितीवर मात करत विद्यार्थ्यांचा
अत्यंत खडतर प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी राहिला आहे.विनीत मनोहरेचे वडील मिस्त्रीकाम (बांधकाम मजूर) करतात. वडिलांच्या घामाच्या थेंबाचे विनीतने या यशाच्या रूपाने सोने केले आहे.ओम हांडेचे वडील फेरीवाला व्यवसाय करून कुटुंबाचा गाडा चालवतात. मात्र, ओमने 'प्रिपरेटरी' रँक मिळवून परिस्थिती कधीच अभ्यासाच्या आड येत नाही हे सिद्ध केले.श्रेया बुरड; श्रेयाने सुद्धा अत्यंत प्रतिकूल आणि गरिबीच्या परिस्थितीशी दोन हात करत आपली गुणवत्तेची परंपरा राखली आणि या यादीत मानाचे स्थान मिळवले.सांची रिंगणे: मुलींच्या गटातून उत्तुंग भरारी घेत नवा आदर्श निर्माण केला.असित म्हैस्के, पीयूष म्हैस्के आणि श्रावणी अंबुलकर: या विद्यार्थ्यांनीही आपल्या कठोर परिश्रमाच्या आणि जिद्दीच्या बळावर या जगातील सर्वात कठीण परीक्षेत यश संपादन करून हिंगणघाटचे नाव देशाच्या नकाशावर कोरले आहे.
सर्वसामान्य आणि कष्टकरी कुटुंबातील मुलांनी आयआयटी सारख्या प्रतिष्ठेच्या परीक्षेत मिळवलेल्या या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण हिंगणघाटसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम असेल तर गरिबी कधीही यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही, हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.

