कचोरी बटाटा,पाववडे,जिलेबी भजे,मिठाई काळ्या शाईच्या पेपरमधून पॅक करून सर्रास पार्सलचा गोरख धंदा...
भुसावळ विभागात अन्नसुरक्षा विभागाची कोणालाही भीती नाही.
(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)
यावल दि.२६
संपूर्ण भुसावळ विभागात लोकप्रिय असलेले कचोरी,
बटाटा,पाववडे,जिलेबी भजे,मिठाई,शेव,शेव चिवडा इत्यादी खाद्य पदार्थ ९०% विक्रेते हे ग्राहकांना काळ्या शाईच्या पेपरमधून पॅक करून पार्सलचा गोरख धंदा सर्रासपणे अनेक ठिकाणी भर रस्त्यावर करीत असल्याने घातक अशी केमिकल युक्त काळी शाई नागरिकांच्या पोटात जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याकडे मात्र अन्नसुरक्षा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चा व्यापारी वर्तुळातच आहे.
यावल रावेर तालुक्यासह भुसावळ विभागात अन्नसुरक्षा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दूध डेअरी,किराणा दुकान,कोल्ड्रिंक्स, हॉटेल्स,खानावळ,रेस्टॉरंट, खात्यातील विक्रेते इत्यादी ठिकाणी तपासणी केली आणि त्याबाबत मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी सुद्धा झाली.ही कारवाई करताना मात्र संपूर्ण भुसावळ विभागात काही संबंधित व्यापाऱ्यांची मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली असल्याची चर्चा व्यापारी वर्तुळात असल्याने खाद्यपदार्थ तपासणी करताना किंवा नमुने घेतले गेल्यानंतर केलेली कारवाई सौम्य प्रमाणात केली असल्याचे सांगून किंवा गुन्हे दाखल होणार नाहीत असे काही व्यापाऱ्यांना सांगून व्यापाऱ्यांची लाखो रुपयाची लूट कोणी केली..? अन्नसुरक्षा विभाग अधिकारी कर्मचारी यांच्या नावावर लूट करणारे कोण.? ठिकठिकाणी शहरात गावात व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सदस्य नियुक्त आहेत त्यांच्यामार्फत कोणी आर्थिक वसुली केली का..? आणि वसुली केली नसल्यास भर रस्त्यावर आणि ठिकठिकाणी अस्वच्छतेच्या ठिकाणी खाद्यपदार्थ कोणत्या नियमाने आणि कोणाच्या आशीर्वादाने तसेच खाद्यपदार्थ हे काळ्या शाईने छापलेल्या कागदात पॅक करून सर्रासपणे ग्राहकांना खाद्य वस्तू विक्री होत आहे हे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना आढळून आले नाही का.? याचप्रमाणे मोठ्या प्रमाणाच्या तापमानात अधिकृतरित्या परवाने न काढलेल्या विक्रेत्यांनी आरोग्यास घातक असे थंडपेय,शुद्धतेचे प्रमाण नसलेले पिण्याच्या थंड पाण्याच्या बाटल्या,थंड पाण्याचे जार भरून पाणी विक्रेते शासनाच्या अनेक अटी,शर्ती, परवाने नियम खड्ड्यात घालून पिण्याच्या पाण्याचा गोरख धंदा खुल्या करीत आहेत याकडे सुद्धा अन्न व सुरक्षा विभाग अधिकारी कर्मचारी यांचे दुर्लक्ष होत असल्याने याबाबतची लेखी तक्रार अन्नसुरक्षा विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे केली जाणार आहे.
भुसावळ येथील जंक्शन रेल्वे स्टेशनवर सुद्धा बटाटा वडे,कांदा भजी,अंडा आमलेट,इत्यादी अनेक वस्तू काळ्या शाईने प्रिंटिंग केलेल्या कागदातून पेपर मधून पॅक करून रेल्वे प्रवाशांना सर्रासपणे विक्री होत आहे याकडे अन्नसुरक्षा विभाग लक्ष देईल का.?

