भद्रावतीत मोठी कारवाई! नवीन भाजी मंडईत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९ जण ताब्यात, लाखोंचा मुद्देमाल जप्त...
( महेश निमसटकर
जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर)
भद्रावती(ता.प्र.):-भद्रावती शहरातील नवीन भाजी मंडई परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत ९ आरोपींना ताब्यात घेऊन ३ लाख ५२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ५ मोटारसायकली व ८ मोबाईल फोन यांचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची पूर्ण नावे :
राजू धनराज कनोजे (वय 38), रा. पंचशील नगर, भद्रावती
सुरज चंद्रलाल सोनवणे (वय 30), रा. सुरक्षानगर, भद्रावती
सोनू सुरेश शेळे (वय 35), रा. अहिल्यानगर, भद्रावती
मंगेश रोषेराव खंडाळकर (वय 36), रा. आंबेडकर वॉर्ड, भद्रावती
राहुल रमेश हटकर (वय 35), रा. आंबेडकर वॉर्ड, भद्रावती,
तुषार मधुकर पचारे (वय 29), रा. त्रिभुंजी वॉर्ड, भद्रावती
योगेश वसंतराव शिंदे (वय 30), रा. किल्ला वॉर्ड, भद्रावती
अनिल गणपत निंबाळकर (वय 49), रा. शिवाजी नगर, भद्रावती
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपींविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 683/2026 अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पोउनि गजानन तुपकर, सपोनि महेंद्र बेसरकर, पोहवा अनुप आरसुतकर, पोआ गोपाल आलाकुलवार, खुशाल कावळे, योगेश घाटोळे, संतोष राठोड, आकाश खंडाळे तसेच भद्रावती पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
भद्रावती पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील अवैध जुगार व्यवसायावर मोठा आळा बसला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अशाच कठोर कारवाया पुढेही सुरू ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे.

