बिलोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; युवा ग्रामीण पत्रकार संघाचे निवेदन•• खरीप हंगाम धोक्यात शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची मागणी

बिलोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; युवा ग्रामीण पत्रकार संघाचे निवेदन

•• खरीप हंगाम धोक्यात शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची मागणी

(नांदेड जिल्हा प्रतिनिधी  : मारोती एडकेवार)

बिलोली : तालुक्यात सुरू असलेल्या खरीप हंगामात अत्यल्प पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांना दोन ते तीन वेळा पेरणी करूनही पीक उगवले नाही. उगवलेली पिकेही पावसाअभावी वाळून गेली आहेत. काही ठिकाणी निकृष्ट व बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे.

या पार्श्वभूमीवर निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघ, बिलोली यांच्या वतीने तहसीलदार, बिलोली यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात बिलोली तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर किमान ₹२५ हजार आर्थिक मदत द्यावी, पीककर्ज वसुली स्थगित करावी, पीकविमा दावे तातडीने मंजूर करावेत तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजयकुमार बिलोलीकर, कार्याध्यक्ष सय्यद रियाज, मिलिंद मांजरमकर, गंगाधर शिंदे, इरेश मुडकर, राजन्ना मामिडवार, सुनील जेठे, सुरेश गाडेकर, यादव कुडकेकर, सिद्धार्थ वाघमारे, विनोद वाघमारे, साईनाथ सिनगारे, ज्ञानेश्वर कोकणे, पत्रकार वैभव घाटे, युवराज धोत्रे, राजेश आमेटवार, शेख मुरतुजा, विलास शेरे, शंकर पवार, शेख अब्दुल, गफार, साई खंडेराय, नागोराव लालापोड, राजेश आमेटवार, दयानंद भद्रे, अमोल शेरे, महेमुद पिंजारी, दीपक गजभारे, साजिद कुरेशी, अब्दुल रशीद, धमानंद भेदेकर, विनोद वाघमारे यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूल राज्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक तसेच तालुका कृषी अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

संघाने शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन केले आहे.
Previous Post Next Post