पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्हयांतील आरोपी शोध घेणे करिता पोस्टे परीसरात रवाना होऊन अज्ञात आरोपीचा तांत्रीक व गुप्त माहीतीच्या आधारे शोध घेत असता सदरचे बँटरी अंकीत मोगरे रा. स्विपर काँलनी हिंगणघाट यांनी चोरी केल्याचे समजले
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
रोजी फिर्यादी नामे श्री. इंद्रजीत हरीनारायण शाहु वय 47 वर्श रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट यांनी पोस्टेला तोंडी रिपोर्ट दिला की, त्यांची घरासमोर ठेवलेला त्यांच्या मालकीचा ट्रॅक्टर व त्यांचे वार्डातील जगदीश कांबळे व सतिश वरटकर यांचे ट्रक्टरची बँटरी कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याबाबत तोंडी रिपोर्ट दिल्यावरून, दिनांक 11/07/02025 रोजी यातील फिर्यादीचे तोंडी वरून पोस्टे ला अपराध क्रमांक 1092/2026 कलम 303(2) भा.न्या.संहीता प्रमाने गुन्हा नोंद करण्यात आला. लागलीच याला ताब्यात घेऊन. गुण्यातील बॅटरी संबंधाने सखोल विचारपूस केली असता गुण्यातील बॅटरी चोरल्याची कबुली दिल्याने त्याचे राहते घरी जाऊन आरोपीच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीच्या ट्रक्टरच्या तीन बँट-या किंमत 7,000 रू प्रमाणे 21,000 रु व एक विना क्रमांकाची होंडा अँक्टीवा मोपेड गाडी किंमत 50,000 रू असा जू.किं. 71,000 रू चा माल मिळून आल्याने जप्त करण्यात आला. ही संपूर्ण कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. श्री. सुशीलकुमार नायक सा. त्यांच्या मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक श्री. अनिल राऊत सा. , सहा. पोलीस निरीक्षक अतुल स्थूल हिंगणघाट यांचे आदेशान्वये डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी कार्यवाही केली.

