१२ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार व हत्येप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा नागरिकांची मागणी
हिंगणघाट तालुक्यातील वडनेर सामाजिक कार्यकर्ते नागरिकांनी मा. पोलिस निरीक्षक पोलीस स्टेशन वडनेर यांच्या मार्फत निवेदन मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
हिंगणघाट तालुका प्रतिनिधी /
हिंगणघाट :- १५ जुलै २०२६ वर्धा जिल्ह्यातील तिगावजवळील रोठा गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेला लैंगिक अत्याचार व त्यानंतर करण्यात आलेली निघृण हत्या ही अत्यंत संतापजनक, अमानवी आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. या घटनेमुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यासह राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली असून महिला व बालिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. गुरुदयालशिंग जुनी यांनी वडनेर येथे मोर्चा काढून या धटनेचा निषेध करीत आरोपी विरुद्ध कटोर कार्यवाही करण्याची मागणी, वडनेर पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आले. गुरुदयाल सिंग जुनी पंढरी शिवणकर नारायण कुंभारे संजय लोकरे ज्ञानेश्वर माणिक पुरे रायबहादूर जुनी अजिंक्य गुजरकर आनंद सिंग टाक सिद्धांत भगत रुपेश मेश्राम हेमंत ब्राह्मणे प्रशांत दरोडे राजेंद्र भोरे किशोर शेख दिनेश चंदनखेडे, सचिन महाजन, ब्युरो तालुका प्रतिनिधी सचिन महाजन हिंगणघाट यांचा उपस्थितीत धटनेचा निषेध करीत आरोपी विरुद्ध कटोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

