*भद्रावतीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा; ९ जुगाऱ्यांना अटक, सुमारे ५.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त**डोलारा तलाव परिसरातील कारवाई; सात मोटारसायकली व सहा मोबाईलसह रोख रक्कम जप्त*

*भद्रावतीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा; ९ जुगाऱ्यांना अटक, सुमारे ५.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त*

*डोलारा तलाव परिसरातील कारवाई; सात मोटारसायकली व सहा मोबाईलसह रोख रक्कम जप्त*

 (महेश निमसटकर 
 जिल्हा विभागीय संपादक)


भद्रावती दि. 30 : भद्रावती शहरातील डोलारा तलाव, पंचशील नगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई करत नऊ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम, सात मोटारसायकली व सहा मोबाईल असा एकूण ५,९८,५३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ३० जुलै २०२६ रोजी रात्री छापा टाकण्यात आला. घटनास्थळी काही व्यक्ती पैसे लावून '५२ तास' जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सर्व आरोपींना ताब्यात घेत पंचनामा केला.
या प्रकरणी भद्रावती पोलिस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी तसेच गुन्हे शोध पथक व भद्रावती पोलिसांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
Previous Post Next Post