**आमचे हिंगणघाट हिरवे करा !उपविभागीय अधिकारी साहेबांना सुपर सेव्हन' कडून आव्हान**
(मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक )
**हिंगणघाट (विशेष प्रतिनिधी दि.१० जून ):**
हिंगणघाटच्या आयआयटी मध्ये निवड झालेल्या ‘सुपर सेव्हन’ने उपविभागीय अधिकारी ह्यांना वृक्ष भेट देऊन हिंगणघाट शहर हिरवागार करण्याचे आवाहन दिले.
आयआयटी परीक्षेत यश मिळवलेल्या हिंगणघाट मधील सातही विद्यार्थ्यांचा सन्मान करत हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे ह्यांनी त्यांना भावी शिक्षण आणि प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. एसडीओ कार्याल हिंगणघाट आयोजित विशेष कार्यक्रमात एसडीओ साहेबांनी सर्व विद्यार्थ्यांशी व्यक्तिशः संवाद साधला आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे ह्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक यशासोबतच आपली सामाजिक बांधिलकी जिवंत ठेवली. सर्व विद्यार्थ्यांनी एसडीओ साहेबांना प्रेमाचे प्रतीक म्हणून एक रोपटे भेट दिले. तसेच विद्यार्थ्यांनी प्रशासनाला भावनिक आवाहनही केले. “आम्ही आता उच्च शिक्षणासाठी शहराबाहेर जाणार आहोत, पण ह्या वर्षीची अतिउष्णता पाहता; आमचे हिंगणघाट वृक्षारोपणातून हिरवेगार व्हावे, अशी आमची मनिषा आहे,” असे मनोगत विद्यार्थांनी मांडले. हल्ली पावसाळ्याच्या सुवर्णकाळात शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करून आणि नागरिकांमध्ये जनजागृती करून संपूर्ण हिंगणघाट शहर अवतारे साहेबांना ‘ग्रीन हिंगणघाट’ बनवण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थांनी संबंधित अधिकारी अवतारे ह्याचे भावी शिक्षणासाठी मोपाचे मार्गदर्शन ग्रहण केले.
विद्यार्थ्यांच्या या पर्यावरणस्नेही आणि सुजाण विचारांचे एसडीओ साहेबांनी तोंडभरून कौतुक केले. मुलानी दिलेला पिंपळ कार्यालयाच्या परिसरातच लाऊ ; त्याला आयआयटी वृक्ष नाव देऊ आणि त्याचबरोबर शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण राबवण्याचे आश्वासन निपाणी घेतले.
सुपर सेव्हनमध्ये विनीत मनोहरे(आयआयटी पवई मेकॅनिकल इंजि.),असित म्हैस्के ( आयआयटी खारकपूर बी एसी रसायन इंजि.), सांची रिंगणे(आयआयटी कानपूर खनिज इंजि.) श्रेया बुरड (आयआयटी कानपूर खनिज इंजि.),पीयूष म्हैस्के,आणि ओम हांडे यांचा समावेश आहे. अत्यंत प्रतिकूल पार्श्वभूमीवरून या विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवून घडवण्याचे श्रेय त्यांच्या मार्गदर्शकांना जाते.शेवटी विद्यार्थ्यांनी अवतारे साहेबांच्या स्वतः स्पर्धा परीक्षेचा प्रवासावर प्रश्न विचारत चर्चा केली. कराडचे इंजिनिअरिंग कॉलेज ते प्रायव्हेट नौकरी आणि मग स्वतः कुठलीही कोचिंग न घेता प्रशासकीय पदावर पोहोचण्याचा प्रेरणादायी प्रवास एसडीओ साहेबांनी सांगितला. एकूण मुलांसाठी प्रेरणा देणारा हा कार्यक्रम ठरला.यावेळी आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आणि टार्गेट अकॅडमीचे मुख्य शिक्षक अक्षय मुंजेवार, निरीचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ संदेश बारहाते, शिक्षण तज्ज्ञ संदेश मून, संचालक सुशांत बारहाते तसेच समुपदेशक रितेश मसाडे, आदी उपस्थित होते.

