हिप्परगा थडी येथील मुस्लिम बांधवांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश
(मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड )
नांदेड : आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराना व जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब यांच्या,नेतृत्वात वर विश्वास ठेवून हिप्पारगा थडी येथील मुस्लिम समाजातील,युवा तरुणांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश केला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची, प्रत्यक्ष धमक वंचित बहुजन आघाडीचे तालुका सदस्य मारुती एडकेवार शाखा अध्यक्ष मुज्जू सय्यद यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पक्षप्रवेश सोहळा साजरी करण्यात आला,यावेळी भारतीय जनता पार्टी व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब यांच्या उपस्थितीत,पक्ष प्रवेश केला यात, गौस बाबुबेग इनामदार,बादर खान पठाण, हरून साब मोमीन,सद्दाम हमीद, साहेब शेख, सुरेश चांदोबा एडकेवार,संग्राम एडकेवार,गोपाळ एडकेवार, निजाम देशय,यांनी पक्ष प्रवेश केला, यावेळी उपस्थित पत्रकार राजेश आमेटवार,वंचित बहुजन आघाडीचे बिलोली तालुका पदाधिकारी मारुती एडकेवार, दीपक एडकेवार,शाखा अध्यक्ष सय्यद मुजाहिद, वंचित चे ज्येष्ठ नेते हिप्परगा थडीचे मोहम्मद चेअरमन साब, खयून चौधरी,मोहम्मद बेलोना, बालाजी एडकेवार,राजू एडकेवार, अमर भालेराव, व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, व गावकरी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर महाजन यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले वंचित बहुजन आघाडी मध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी व पक्ष हा प्रत्यक्ष तुमच्या सोबत उभा आहे सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हाच पक्षाचा अजेंडा असून मुस्लिम बांधवांसोबत वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभे आहे असे यावेळी मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका पदाधिकारी मारोती एडकेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन शाखाध्यक्ष मजू भाई सय्यद यांनी केले.

