सरकारकडून कोणताही संपर्क नाही!, जरांगे पाटील यांची मोठी घोषणा सर्वांना एकत्र जाणे शक्य नाही, 12 सप्टेंबरपर्यंत हळूहळू मुंबईकडे निघा

सरकारकडून कोणताही संपर्क नाही!, जरांगे पाटील यांची मोठी घोषणा सर्वांना एकत्र जाणे शक्य नाही, 12 सप्टेंबरपर्यंत हळूहळू मुंबईकडे निघा

(बिड/प्रशांत बाफना जिल्हा विभागीय संपादक)


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस, आंदोलनस्थळावर कालापासून वाढत्या पोलिस बंदोबस्तामुळे आज सरकारचं शिष्ठमंडळ आंतरवालीत दाखल होणार अशा अपेक्षा होत्या. तस्या माध्यमांतून बातम्या सुरू होत्या. सरकारच्या शिष्ठमंडळाची प्रतिक्षा असतानाच जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. आंदोलनाचा तिसरा दिवस उजडला तरीही सरकाडून कोणतीही ठोस चर्चा झाली न झाल्याने जरांगे पाटील यांनी सोमवारी (दि.31) पत्रकार परिषदेत मराठा समाजास मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन केले. 


आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी सोमवारी सरकारचे शिष्ठमंडळ आंतरवालीत येणार असल्याचे रविवार दि.30 पासून माध्यमांतून सांगण्यात येत होते. मात्र, सरकारच्या शिष्ठमंडळाची प्रतिक्षा कायम असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी 10

:00 वाजताच्या दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत मराठा समाजास आवाहन करत मुंबईकडे कूच करण्याचे स्पष्ट संकेत दिले. जरांगे पाटील म्हणाले की, “ आम्ही मुुंबईला जायची तयारी करतोय, मराठा समाजाला सांगतो 12 सप्टेंबरपर्यंत हळूहळू मुंबईला जा. आपल्या सोयीनुसार तिथे राहा, फक्त आझाद मैदानावर जाऊ नका. मराठे मुंबईत आलेले त्यांना कळले नाही पाहिजे. पाहुणे, मित्र यांच्याकडे राहा. पोलिसांनी तुम्हाला जर उचलून नेले तर बिनधास्त पोलिस स्टेशनला जा, उलट तिथे चांगली सोय होते. उपोषण सोडणार नाही, मी बरोबर मुंबईत जातो, असंही ते म्हणाले. 

जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले. सगळे सोबत जाणे शक्य नाही, सरकारकडून कोणीही संपर्क साधलेला नाही. आमचे 12 तारखेला ठरल्यावर जाणार, गणेशोत्सव आपला आहे, आम्ही 11 दिवस गणपती बसवतो ते दीड दिवस बसवतात आणि ते आम्हाला देव-देव शिकवतात, आमच्या एवढं पुण्य कोण करतं, असे देखील त्यांनी म्हटले. मंत्री उदय सामंत यांच्या संभाव्य दौर्‍यावर आणि सरकारच्या संपर्कावर ते म्हणाले, “ 24 तासात संपर्क साधू म्हणजे पावसासारखं आहे का, हळू हळू सरी पडणार. पोराहो आपले मुंबईचे सुरू करा,” असा संदेशही त्यांनी दिला. 


दरम्यान, परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनी रविवारी (दि.30) आयोजित केलेला शेतकरी मेळावा रद्द करण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता, तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पाडला. यावर जरांगे पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी दौरा रद्द केला होता. पुन्हा 10 मिनिटांनी कोणत्या तरी, अधिकार्‍यांनी जरांगे पाटलांनी सूट दिली असा मॅसेज त्यांना दिला. त्यामुळे ते आले. आम्ही भिडलो असतो तर एकनाथ शिंदे साहेबांना पळायला सुद्धा जागा राहिली नसती, अशी मिस्किल टिकाही त्यांनी केली
Previous Post Next Post