कवठा ग्रामपंचायतीच्या सरपंचांकडून मृतक अमित कुमरे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत
कवठा, प्रतिनिधी
: कवठा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रविण रामदासजी जायदे यांनी मृतक अमित कुमरे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. अमित कुमरे यांच्या निधनामुळे कुटुंबावर आलेल्या दुःखाच्या प्रसंगी सरपंच प्रविण जायदे यांनी कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी कुटुंबाला या कठीण प्रसंगी शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. सरपंचांनी केलेल्या या मदतीबद्दल मृतक अमित कुमरे यांच्या कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.
या वेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य तसेच शरद काठुके ,गोलु आबंटकर,आकाश कुमरे,चंदाताई केराम शंकर माथनकर याच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. समाजातील गरजू कुटुंबांच्या अडचणीच्या काळात त्यांना आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचे सरपंच प्रविण जायदे यांनी यावेळी सांगितले.

