शिक्षित होण्यापेक्षा सुशिक्षित व्हा - साहित्यिक अनंत कराड (गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न)

शिक्षित होण्यापेक्षा सुशिक्षित व्हा - साहित्यिक अनंत कराड 
(गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न)

(अहिल्यानगर जिल्हा संपादक (प्रशांत बाफना) 

 पूर्वीपेक्षा आज समाजाची शैक्षणिक स्थिती खूप चांगली असूनही गतकाळातील पिढीने अनुभवलेले सुख, समाधान, शांती, आनंद हल्लीच्या माणसांना मिळेनासे झालेय हे कशाचे लक्षण आहे? शिक्षणाने मानव सुसंस्कृत होत नसेल तर असे शिक्षण काय कामाचे? अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चाललीय. त्यामुळे आजी आजोबांना घरातून हद्दपार न करता ती विद्यापीठंच तुमच्या मुलांना नैतिकतेचे धडे देतील यावर विश्वास ठेवा असे आवाहन एकता फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा म.सा.प.संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी संचालक जेष्ठ साहित्यिक अनंत कराड यांनी केले. ते शहरातील श्री चौंडेश्वरी सभागृहात देवांग कोष्टी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभामध्ये उद्घाटक म्हणून बोलत होते.
         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नमाला भागवत होत्या. याप्रसंगी इ.६वी ते १२वी, पदविका, पदवी व पदव्युत्तर परिक्षा, नवोदय, एन.टी.एस., एन.एम.एस.एस., क्रिडा स्पर्धा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, जे.ई.ई., सी.ई.टी., नीट या परीक्षांमध्ये भरघोस गुण घेऊन प्राविण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, भेटवस्तू, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चौंडेश्वरी मंदिर ट्रस्ट पाथर्डी चे अध्यक्ष रामदास कांबळे, चिटणीस किशोर पारखे, उपाध्यक्ष कृष्णा रेपाळ, विश्वस्त गजानन भंडारी, ह.भ.प.अमोल महाराज सोळसे, नारायण भागवत, हरिष भागवत यांच्यासह विद्यार्थी गुणगौरव समितीचे केशव भागवत, अभिजित भागवत, अमोल खोले, नितीन भागवत, अमोल भंडारी, सुभाष गुरसाळी, गणेश रोकडे आणि चौंडेश्वरी उत्सव समिती, चौंडेश्वरी महिला मंडळ, संघर्ष महिला ग्रुप, चौंडेश्वरी विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी, गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
Previous Post Next Post