धर्माबाद : केशव प्राथमिक विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉनमध्ये धावताना विद्यार्थी.'अमृत दौड'ने धर्माबादेतील रस्ते गजबजले राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त केशव प्राथमिक विद्यालयात मिनी मॅरेथॉन

धर्माबाद : केशव प्राथमिक विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉनमध्ये धावताना विद्यार्थी.

'अमृत दौड'ने धर्माबादेतील रस्ते गजबजले राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त केशव प्राथमिक विद्यालयात मिनी मॅरेथॉन

(धर्माबाद तालुका प्रतिनिधी सज्जन संतोष)

: पहाटेच्या प्रसन्न वातावरणात धावपटूंच्या पावलांनी धर्माबादेतील रस्ते गजबजले. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन तसेच भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केशव प्राथमिक विद्यालयात 'अमृत दौड' मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.

संस्थेचे स्थानिक कार्यवाह सूर्यकांत येरावार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास नगरसेवक उमेश झंवर यांच्या हस्ते फीत कापून प्रारंभझाला. पोलिस हेडकॉन्स्टेबल बालाजी कौठकर, शंकर गेवारे, स्वराज्य स्पोर्ट्स अकादमीचे संचालक अविनाश

भरत सावरगावे, अक्षयनी गोस्कुलवाड प्रथम

पुरुष गटात भरत सावरगावे प्रथम, उदय दासरवार द्वितीय व आशिष जाधव तृतीय ठरले. महिला गटात अक्षयनी गोस्कुलवाड प्रथम, रागिणी पांचाळ द्वितीय व अनुराधा पिटलेवाड तृतीय आल्या. गंगाप्रसाद रामुलकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. विजेत्यांना पदके व प्रमाणपत्रे देण्यात आली. पर्यावरण संवर्धन, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वबोध व नागरी कर्तव्य या 'पंचपरिवर्तनाचा' संदेशही देण्यात आला.

ताडोड, क्रीडा शिक्षक गणेश शिंदे, पत्रकार अब्दुल रजाक, शालेय समिती अध्यक्ष गोवर्धन मालू आणि संयोजक तथा मुख्याध्यापक श्रीधर चिंचोलीकर उपस्थित होते.

मान्यवरांनी भारतमाता व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

सुनिता पाटील यांनी ध्यानचंद यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. पं चकमेटी गोरक्षण संस्थेच्या कमानीपासून सुरू झालेली दौड हुतात्मा पानसरे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे न्यायालयासमोरील रस्त्याने पुन्हा स्पर्धास्थळी आली.

Previous Post Next Post