भटक्या-विमुक्त जाती दिन उत्साहात साजरा
एसपी कार्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन; समाजाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन
(जळगाव तालुका विभागीय संपादक किशोर चव्हाण)
जळगाव, दि. 31 ऑगस्ट 2026 :
भटक्या-विमुक्त जाती दिनानिमित्त जळगाव येथील एसपी कार्यालयात दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला एसपी श्रीकांत धिवरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भटक्या-विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. समाजातील नागरिकांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन शासनाच्या विविध योजना व सुविधांचा लाभ घ्यावा, तसेच आपल्या हक्कांबाबत जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले.
भटक्या-विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन, पोलीस विभाग आणि समाजातील नागरिकांनी परस्पर समन्वयाने काम करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. समाजाच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचा संदेशही देण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व समाजबांधवांनी भटक्या-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.
— मीडिया पोलीस टाईम, जळगाव
तालुका विभागीय संपादक : किशोर सोमा चव्हाण

