पत्रकार मनोज किर्तने यांना ' सर्वोत्कृष्ट पत्रकार' पुरस्कार प्रदान.
मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सत्कार.
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
दैनिक सूर्यवार्ता,उपसंपादक, संघर्ष सातपुते छ.संभाजीनगर.
'दैनिक सूर्यवार्ता' या लोकप्रिय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपणारे निर्भीड, अभ्यासू पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज किर्तने (माहूर तालुका प्रतिनिधी) यांना दैनिक सूर्यवार्ता परिवारातील 'महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार २०२६' देऊन सहकुटुंब विशेष सन्मानित करण्यात आले.
मसिआ फंक्शन हॉल छ. संभाजीनगर (औरंगाबाद )येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या या शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ आणि 'दैनिक सूर्यवार्ता'चे मुख्य संपादक प्रकाश सातपुते यांच्या हस्ते शाल, सुवर्णपदक, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन मनोज किर्तने यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
चळवळीतील विद्रोही कार्यकर्ता, सामाजिक नेतृत्व ते चौफेर अभ्यासू पत्रकार असा मनोज किर्तने यांचा थक्क करणारा प्रवास राहिला आहे. माहूर तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणींना वाचा फोडणे,
शासकीय-प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवणे, सत्तेला प्रश्न विचारणे आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच निर्भीडपणे लेखन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय पत्रकारितेची दखल घेऊनच त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या सोहळ्यास आ . प्रशांत बंब , जी.प.अध्यक्ष अविनाश गलांडे,उपजिल्हाधिकारी अरुण जराड, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद दुसाने मनपा प्रशासकीय अधिकारी संजय रगडे, छावणी प्रशासकीय अधिकारी वैशाली केनेकर, जे जे प्लस हॉस्पिटल चे संचालक डॉ. जीवन राजपूत, स. पोलीस आयुक्त नरेंद्र पाडळकर,पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, मोहम्मद अयाजुद्दीन, शेख हादी भाई, रखमाजी जाधव पाटील, राजेंद्र दाते पाटील, एडवोकेट पद्माकर तांदूळजे, एडवोकेट बाळासाहेब मस्के, सुनील सोनवणे, माजी बांधकाम सभापती संतोष जाधव, ज्येष्ठ पत्रकार नारायण पूरकर, छावणी परिषदेचे उपाध्यक्ष प्रशांत तारगे, करण सिंग काकस, एम ए हजर यांचेसह राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. "किर्तने यांची अभ्यासू मांडणी आणि लेखणी ही राज्यातील तरुण पत्रकारांसाठी प्रेरणादायी असून प्रशासन व जनतेमधील सकारात्मक दुवा म्हणून त्यांचे अविरत कार्य चालू असल्याचे संपादक प्रकाश सातपुते यांनी आपल्या भाषणात सांगितले.
सत्काराला उत्तर देताना मनोज किर्तने यांनी हा सन्मान आपल्या वाचकवर्गाला, संपादक मंडळाला,सहकाऱ्यांना आणि पत्रकारितेतील मूल्यांना समर्पित केला. भविष्यातही माहूर तालुक्याच्या विकासासाठी व लोकहितासाठी संघर्षाबरोबरच आपली लेखणीही अशीच अविरतपणे चालत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. या यशाबद्दल माहूर तालुका, वर्धा जिला पत्रकार अब्दुल कदिर,सह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

