पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त अभिवादन. ( शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी ). परभणी. जयंतीनिमित्त वृक्षारोपण.सेलू : दि.३१ मे शुक्रवार रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त प. पू. गुरूमाऊली यांच्या कृपाशीर्वादाने व कृषीमित्र गुरुपुत्र आ.आबासाहेब मोरे यांच्या आदेशाने श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बाल संस्कार सेवा केंद्र महेशनगरच्या वतीने शहरातील राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर समाज मंदिर न्यू हायस्कूल समोर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धा कृती पुतळ्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश मुळे,सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, नागेश कुलकर्णी, संजय गव्हाडे,सुनील नवले, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच जयंती निमित्त वडाचे झाड लावून वृक्षा रोपन करण्यात आले. त्या वृक्षाचे संगोपन करण्याची जाळी बसविण्यात आली आहे याप्रसंगी प्रकाशराव मुळे,नागेश कुलकर्णी, शिवाजीराव हारकळ, संजय गव्हाडे, सुनील गायकवाड, गणेशराव नाटकर, आशोकराव खताळ, सचिन धापसे,माणिक पडुळे,विजय धापसे, विजय दळवे, प्रल्हाद भिसे, दत्ता रोकडे,प्रमोद हिंगे, लक्ष्मी भिसे, पुजा भिसे, बाळकृष्ण भिसे,पवन भिसे, अमोल बाबर,करण धापसे ,विलास धापसे,आदि उपस्थित होते.

Previous Post Next Post