खासदार संजय जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त उद्या रक्तदान शिबीर. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी). परभणी : दि.31 मे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि.1 जून रोजी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. खा. संजय जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या मित्र परिवारातर्फे दरवर्षी रक्तदान शिबीर, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, रुग्णांना फळे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षीही असे कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सद्या स्थितीत जाणवत असलेला रक्ताचा तुटवडा आणि सामान्य रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन खा. संजय जाधव यांच्या मित्र परिवारा तर्फे हे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. हे रक्तदान शिबीर शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत परभणी शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित केले आहे.जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सामाजिक जाणिवेतून या शिबिरात रक्तदान करून सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे. असे आवाहन खा. संजय जाधव यांच्या मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

