तेलंगणातून येणारा गुटखा जप्त१९ लाखाचा गुटखा वाहना सह जप्त : अन्न व औषध प्रशासन विभागाची धाडसी कारवाई... (स्वप्नील मगरे शहर प्रतिनिधी उमरखेड )उमरखेड आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात विदर्भात येत असून तो रोखण्यासाठी आता अमरावती विभागीय पातळीवरील अन्नसुरक्षा विभाग सक्रिय झाला असून काल याच विभागाने हादगाव उमरखेड रोडवर सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान एका वाहनाला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये 48 बोरी सुगंधी तंबाखू पान मसाला आढळून आला. ३० मे रोजी अन्नसुरक्षा अधिकारी संदीप सूर्यवंशी अन्य सुरक्षा अधिकारी दक्षता यांच्या पथकाने हदगाव उमरखेड रोडवर सायंकाळी चार वाजता माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी सापळा रचला आणि आदीलाबादतेलंगणा येथून सुगंधी तंबाखू घेऊन येणारे वाहन महिंद्रा बोलेरो थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ४८ बोरी सुगंधी तंबाखू पान मसाला आढळून आला आहे या वाहनाचा क्रमांक टी एस झिरो एक यु ए ३३२० असा आहे संबंधित वाहन या रोडने येत असतानाच या मार्गावर असलेल्या पथकाने आपल्या पथकाला मोबाईल वरून माहिती देत सतर्क केले आणि अलगद हे वाहन या रोडवर पकडण्याचा प्रयत्न केला असता सदर वाहन पळून जाण्याच्या तयारी रस्तांनाच त्याचा पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले या वाहनाचा चालक शेख समीर हुसेन वय वर्षे २५ राहणार आदीलाबाद तेलंगणा हा असल्याचे सांगण्यात आले अन्न सुरक्षा पथकाने ताब्यात घेतलेला पान मसाला पंचनामा करून तो पुढील कारवाईसाठी पोलिसांकडे सुपविण्यात आला तर पानमसाला मात्र याच विभागाने आपल्याकडे ठेवला यात अन्नसुरक्षा विभागाने पोलिसांकडे तक्रार नोंदविली पोलिसांनी या आरोपी विरुद्ध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहे पोलिसांनी मालाचा पंचनामा करून बाराशे एक किलो तसेच पान मसाला आणि वाहन असा १९ लाख ३५ हजार ७८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चौकशीत घेतला आहे चौकट विभागीय अन्नसुरक्षा विभागाची कारवाई? स्थानिकांचे काय ?यवतमाळ येथील अन्नसुरक्षा विभाग अलीकडे कामकाज करण्यामध्ये कमी पडतो की काय अशी शंका आता वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना येऊ लागली आहे त्यामुळेच वरच्या स्तरावरूनच आता कारवाई करण्याचे धाडस केल्या जात आहे.

Previous Post Next Post