जिल्हा परिषद शाळेत भरणार अंगणवाडी, शिक्षण विभागाकडून कार्यवाहीला सुरवात. (.राहुल दुगावकर,जिल्हा प्रतिनिधी,नांदेड) नांदेड जिल्ह्यातील अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेतील रिकाम्या व अतिरिक्त न वर्गखोल्यांमध्ये भरविण्याची कार्यवाही अंमलात येत असून या संदर्भातील आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी न माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व एकात्मिक बाल विकास अधिकारी यांना २४ मे रोजी निर्गमित केले आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला असून तालुकास्तरावरील जिल्हा नगर परिषदेच्या शाळेत उपलब्ध असलेल्या रिकाम्या व अतिरिक्त वर्गखोल्यांची माहिती सोमवारी (ता. २७ मे) संकलित करून पाठवावी. तसेच ३१ मे पर्यंत शाळेतील रिकाम्या व अतिरिक्त वर्गखोल्यांमध्ये - अंगणवाडीचे वर्ग चालू करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना निर्गमित पत्रात नमूद आहेत. या 5 आदेशाच्या अंमलबजावणीमुळे गावातील विविध भागात असणाऱ्या अंगणवाड्यात शालेय व्यवस्थापनाच्या देखरेखीत येणार आहेत. पंचायत समिती स्तरावरून वरिष्ठांकडून उपलब्ध झालेल्या शाळा व अंगणवाडी यांच्या यादी बाबत कार्यवाही सुरू झाली आहे. निर्गमित पत्रात शालेय शिक्षण विभागाने शाळेतील रिकाम्या व अतिरिक्त वर्गखोल्या अंगणवाड्यांच्या वापरासाठी देण्यास संमती दिल्याचे स्पष्ट केले आहे. तालुका स्तरावर परस्पर समन्वयाने वर्गखोल्या उपलब्धतेची कार्यवाही करण्याची सूचना पत्रात आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील अंदाजे एक लाख अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळेला जोडून चिमुकल्या विद्यार्थयांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून अध्यापन कार्य होणार आहे. परिणामी यापुढे इंग्रजी शाळांमधील केजी, युकेजी प्रमाणे अंगणवाड्यांमध्ये फलककार्य दिसून अंगणवाड्यातील विद्यार्थयांच्या हातामध्ये प्रथमच वही पेन येणार असल्याचे मानले जाते. अंगणवाडी कर्मचारी यांना नवीन आदेशाबद्दल अद्यापही फारशी माहिती नसून अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येनुसार वर्गखोल्या उपलब्ध नसल्याच्या पार्शवभूमीवर आदेशाच्या अंमलबजावणी बद्दल उत्सुकता वाढली आहे.

Previous Post Next Post