*वाघोलीतील सततच्या वाहतूक कोंडीला नागरिक वैतागले.*. (जिल्हा प्रतिनिधी - स्वरूप गिरमकर पुणे ) वाघोली : वाघोली येथील केसनंद चौकातील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग शोधणे वाहनचालकांसह नागरिकांना जिकरीचे झाले आहे. सततची वाहतूक कोंडी वाघोलीकरांची डोकेदुखी ठरत आहे.पोलिस आणि महापालिकेकडून योग्य ते नियोजन करत वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. वाहतूक नियोजनातील समस्या मात्र कायम आहे. वाहतूक कोंडीत यामुळे भर पडत आहे. प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने पादचारी, व्यावसायिक, रुग्णालय, बँक, हॉटेल येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसह परिसरातील रहिवाशांना मार्गक्रमण करताना अडचण येते. बेशिस्त वाहन चालक आणि महापालिका, पोलिसांच्या नियोजनाचा अभाव यामुळे येथील वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी असलेला अनधिकृत खासगी बस आणि वाहनांचा थांबा. वाहतूक कोंडीत भर टाकत आहे. त्यामुळेही वाहतूक कोंडी होऊन अपघाताच्या घटना घडत असतात. तसेच इतर भागातीलही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी नागरिक करत आहे. *वाहतूक कोंडीची कारणे*- पोलिसांच्या नियोजनाचा अभाव- अतिक्रमणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष - बेशिस्त वाहन चालक- रस्त्यांना पडलेले खड्डे- बेशिस्त वाहन पार्किंग- अधिकृत पार्किंगचा अभाव- विरुद्ध दिशेने प्रवास.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

