चोरीचे 06 अन फसवणूकीचा 01 गुन्हा उघडकीस गुन्हे शाखेची कामगिरी :05 संशयित चोरटे जेरबंद. ( सोलापूर (प्रतिनिधी ) एम आयडीसी पोलीस ठाणे व जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी, सायकली व रोकड चोरीला गेली होती. या सहा गुन्ह्यातील पाच संशयित आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.सोलापूर शहरातील पद्मा नगर व अन्य परिसरातून चोरट्यांनी चारसायकली चोरुन नेल्या होत्या. याशिवाय विजापूर नाका, फौजदार चावडी पोलिसांच्या हद्दीतील गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी शहर गुन्हे शाखेची पथके प्रयत्न करीत होते. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्या पथकाने चार गुन्ह्यातील पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर ते गुन्हे उघडकीस आले आहेत. रविकांत यशवंत काळे (रा. वैष्णवी नगर भाग-२, सैफुल) याला ताब्यात घेऊन चौकशीकेली. त्यावेळी फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जुना पुना नाका येथून एका प्रवाशाची दागिने, लॅपटॉप असलेली बॅग रिक्षातून पळवून नेल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडून दोन लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच सर्फराज मान्नू अन्वरहुसेन इराणी (रा. हांडेवाडी रोड, हडपसर) याच्याकडून जोडभावी पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चेरीला गेलेली २० हजार रुपयांची रोकड हस्तगत केलीआहे. तसेच बाबू शामलाल कुकरेजा (रा. भैय्या चौक, निरवासी चाळ) व राजू लक्ष्मण कुकरेजा (रा सुरवसे नगर कुमठा नाका) यांनी चोरलेल्या चान सायकली देखील पोलिसांनी हस्तंगत केल्या आहेत. तर नागेश भीमाशंक पाटील (रा. चनशेट्टी अपार्टमेंट, भवान पेठ) याच्याकडून एक दुचाकी हस्तगत केली आहे. ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्य पथकाने केली आहे.

चोरीचे 06 अन फसवणूकीचा 01 गुन्हा उघडकीस गुन्हे शाखेची कामगिरी :05 संशयित चोरटे जेरबंद.                       
Previous Post Next Post