सोलापूरात उबाठा सेनेत बिघाडी आता काँग्रेस राष्ट्रवादी ला देणार झटका.. ( सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापुरात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे विधानसभा निवडणुकीत गद्दारीचा राग मनात धरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला झटका दिला आहे सोलापूरात शनिवारी दिनांक 30 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी पत्रकार परिषद घेतली आता त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी बरोबर न लढता स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला दक्षिण सोलापूर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी मध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत असल्याची मागणी लावून धरत आधी काँग्रेस तर्फे दिलीप माने धर्मराज काडादी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला नंतर मात्र दिलीप माने यांनी अर्ज माघारी घेतला दुसरा उमेदवार धर्मराज काडादी यांनी आपला अर्ज कायम ठेवला त्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्या प्रचारात सक्रिय नव्हते उलट त्यांनी धर्मराज काडादी यांचा उघडपणे प्रचार केला त्यात माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे बाळासाहेब शेळके आदी प्रमुख नेत्यांसह अन्य काही नेत्यांचा समावेश होता या बंडखोर नेत्या शिवाय काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे याही अमर पाटील यांच्या प्रचारात गेल्याच नाहीत यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापुरातील सभेत शिंदे यांची कान उघाडणी ही केली होती. त्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे या दोघांनीही महाविकास आघाडीतील शिवसेनेचा उमेदवार सक्षम नसल्याचे कारण देत अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना मतदान केल्याचे सांगितले त्यामुळे काँग्रेसचे मोठे प्रमाणात मतदान धर्मराज काडादी यांच्याकडे वळाले आणि अमर पाटील यांचा खूप मोठा पराभव झाला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी शनिवारी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सनिवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली

सोलापूरात उबाठा सेनेत बिघाडी आता काँग्रेस राष्ट्रवादी ला देणार झटका..                                                                                      
Previous Post Next Post