*मानवतमध्ये शिवप्रताप ग्रंथाचे पारायण शिव जयंती निमित्त उपक्रम*. (मानवत // प्रतिनिधी.)राज्यात सर्वत्र ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा या ग्रंथाचे पारायण केले जाते आणि महापुरुषांची जयंती असेल तर मिरवणूक काढली जाते. मात्र मानवत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवप्रताप ग्रंथाचे सामूहिक पारायण करण्यात येत आहे. शनिवार, दि. 15 रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यासमोर ग्रंथ वाचनास प्रारंभ झाला असून बुधवार, दि. 19 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी समारोप होणार आहे. पारायणाचे नेतृत्व ज्ञानेश वारकरी गुरुकुलाचे ह.भ.प. पंडित महाराज डाके हे करत आहेत.यावेळी ज्ञानेश वारकरी गुरुकुलाचे विद्यार्थी, शिवभक्त यांची उपस्थिती होती. *शिवचरित्र घराघरात पोहोचले पाहिजे* छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र प्रेरणादायी असल्याने राज्यातील प्रत्येक घरात शिवचरित्र पोहोचले पाहिजे. समाजातील सर्व युवक, विद्यार्थी, महिला यांनी शिवचरित्राचा अभ्यास करणे आवश्यक असल्याने पारायणास जास्तीत जास्त शिवभक्तांनी उपस्थित रहावे. असे आवाहन गोटू भरकड उपाध्यक्ष सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.*.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

