.*नागरजवळा* जि.प. शाळेतील शालेय मुलांनी लेझीम पथकाद्वारे शिवरायांना केले अभिवादन. (मानवत // प्रतिनिधी.)मानवत तालूक्यातील नागरजवळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थी व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १९ फेब्रुवारी शिव जन्मोत्सवाच्या निमित्ताने मानवत येथे आयोजित शिव जयंती निमित्त सकाळी नऊ वाजता लेझीम पथकाद्वारे विविध कवायती सादर करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी नागरजवळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम डान्स आणि विविध गीता द्वारे शिवरायांना मानाचा मुजरा सादर केला.दैवत छत्रपती, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सवारी भवानी चौकामध्ये, आणि आम्ही शिवकन्या या गीतावर शालेय विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य सादर करून उपस्थितासह सर्व शिवभक्तांचे मन जिंकली याप्रसंगी लेझीम पथकाला श्री गुलाब दादा लाड आणि श्री सोनय्या किर्तनकार यांनी मार्गदर्शन केले.यावेळी लेझीम पथकामध्ये ओंकार होगे, शिवराज रासवे, पवन होगे, श्रीराम होगे, नवनाथ रासवे, सिद्धांत होगे, संदीप होगे, रूपाली रासवे, श्रद्धा वाघ, नम्रता होगे, प्रेरणा होगे, सुप्रिया होगे, गौरी होगे, विद्या भोंडवे, दिव्या होगे, दिव्या सरांडे यांच्या सह एकूण 65 नागरजवळा जिल्हा परिषद शाळेतील शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम पथकात सहभाग नोंदविला सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजे पर्यंत या लेझीम पथकाने उपस्थित सर्व शिवभक्तांचे विविध शिव गीते आणि लेझीम नृत्यद्वारे शिवरायांना अभिवादन करून सर्व शिव प्रेमी नागरिक व शिव भक्तांची मन जिंकली सार्वजनिक शिव जन्मोत्सव समिती व नागरजवळा जिल्हा परिषद शाळेच्या संयूक्त विद्यमाने शिवजयंती महोत्सव मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात आला.*
byमीडीया पोलीस टाईम
-
0

