विमाच्या नावाखाली रावेर शहरातील स्टेट बँकेकडुन ग्राहकाचे 19999 रूपये दोन वेळा डेबिट करुन ग्राहकाची फसवणूकीचा प्रकार आला समोर. रावेर तालुक्यातील अजब स्टेट बँकेचा गजब कारभार. ग्राहकांची फसवणूक करुन स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांकडुन उडवाउडवीची उत्तरे देण्यात स्टेट बँक कर्मचारी माहिर असल्याचे तालुक्यातील जनतेकडुन बोलले जात आहे.रावेर तालुक्यातील सुप्रसिद्ध आणि मोठ्या प्रमाणात ग्राहक असलेली आणि सुफारफास्ट सेवा देणाऱ्या स्टेट बँक रावेर शाखेचा भोंगळ कारभार समोर आल्याची घटना घडली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की रावेर शहरात असलेली स्टेट बँक च्या कर्मचाऱ्यांच्या फसवणूक करण्याचा आणि उद्धट वागणुकीचा प्रकार समोर आला आहे.अशा दिशाभुल करणार्या प्रकारामुळे तालुक्यातील ग्राहकांमधे ह्या फसवणूकी प्रकारामुळे आणि उद्धट वागणुकीमुळे तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करण्याच्या प्रतिक्रिया तालुक्यातील जनतेमध्ये ग्राहकांमध्ये दिसत आहे.तसेच सुशिक्षित व्यक्तीची जर अशा प्रकारे दिशाभूल करुन एकाच ट्रांजेक्शन आयडी वर दोन वेळा 19999 डेबिट करुन उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत तर सर्वसामान्य नागरिकांबाबत ग्राहकांबाबत स्टेट बँकेकडुन उत्तम सेवा मिळेल याचा विचार न केलेलाच बरा.त्याचबरोबर ह्या रावेर स्टेट बँक शाखेत एखादा ग्राहक बँकेत आपल्या खात्याची माहिती घेण्यास आला असता शिपाई पासुन तर मेनेजर पर्यंत सर्वांची उदासीन वागणुक समोर आली आहे.अशा ह्या उद्धट वागणुक करणार्या करणार्यांना सेवेतून बडतर्फ करुन नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि दोन वेळा 19999 रक्कम ही 12 मार्च 2025 रोजी बँकेकडुन डेबिट केली आहे ती रक्कम ग्राहकास व्याजासह परत मिळावी अशी रास्त स्वरूपाची मागणी रावेर तालुक्यातील ग्राहकांकडुन आणि जनतेकडून करण्यात आली आहे
byMEDIA POLICE TIME
-
0