*करमाळा एसटी बस आगारात भाविकांना वाढीव दरात नाथ जल विक्री केल्या प्रकरणी स्टॉल धारकास १०००रु. दंडाचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सोलापूर विभाग नियंत्रकाचे आदेश* -- *भगवान चौधरी तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या तक्रारीची दखल .. ( जळगाव प्रतिनिधी)दि. २८/६/२०२५ रोजी भगवान चौधरी हे पंढरपूर वारीस जाण्यासाठी जळगाव पंढरपूर महामंडळाच्या बसने प्रवास करीत होते सदर बस करमाळा जिल्हा सोलापूर याठिकाणी डीझेल घेण्यासाठी थांबली असता तेव्हढ्यात गाडीतील पंढरपूर जाणारे भाविक (नाथ जल) पाण्याची बाटली घेण्यासाठी सद्गुरू स्टॉलवर गेले असता कोणतेही बिल न देता १५ रु. किंमत असणारी बाटली २० रु प्रमाणे दिली श्री चौधरी यांनी बिलाची मागणी केली असता बिल दिले नाही. शासन परिपत्रक सामान्य स्थायी आदेश क्र. ११९९ दि. ३/३/२००८ अन्वये प्रत्येक बस आगारात नाथ जल पाण्याची बाटली १५ रुपयास विक्री करणे बंधनकारक आहे. या अनिष्ट व्यापार पध्दतीने विक्री करणाऱ्या स्टॉल धारका विरुद्ध भगवान चौधरी यांनी ऑनलाईन आपले सरकार पोर्टल तक्रार दाखल केली, सदर तक्रारीची तात्काळ दखल घेत सोलापूर अधिक्षक विभाग नियंत्रक यांनी सदर परवाना धारक विक्रेत्याला १००० रु. दंडाचे आदेश दिले, सदर स्टॉल धारकाने वारंवार तीच चुक केली तर परवाना रद्द करण्याबाबत आदेश दिले.

*करमाळा एसटी बस आगारात भाविकांना वाढीव दरात नाथ जल विक्री केल्या प्रकरणी स्टॉल धारकास १०००रु. दंडाचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,  सोलापूर विभाग नियंत्रकाचे आदेश*  -- *भगवान चौधरी तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या तक्रारीची दखल 
Previous Post Next Post