सावदा फैजपूर परिसरासह जिल्ह्यात अवैध धंदे आणि जुगार अड्यांचा महापुर. पोलिस प्रशासनाची बघ्याची भुमिका अनेकांचे संसार ह्या जुगारांच्या महापुरात वाहुन जाण्याची दाट शक्यता (जळगाव जिल्हा प्रतिनिधी ) सावदा फैजपूर वाघोदा,गाते,न्हावी परिसरात जुगार अड्ड्यांना अवैध धंद्यांना महापुर आला आहे हा जुगार अंड्यांच्या महापुरात अनेकांचे संसार वाहुन जाण्याची दाट शक्यता भासु लागली आहे हा जुगार अड्डयांचा महापुर अतिशय भयंकर येऊ शकतो त्याआधी जुगार अड्डे अवैध धंदे कायम स्वरुपी बंद करावे अशी तालुक्याच्या जनतेसह जिल्ह्यातील जनतेची जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे रास्त स्वरुपाची मागणी आहे याबाबत अधिक माहिती अशी सावदा फैजपूर हा बनाना सिटी म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध शहर आहे आणि ह्या परिसरात मजुरांना देखील रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो आणि ह्याच परिसरात जुगार अड्डे अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत तसेच ह्या जुगार अड्डयांना अवैध धंद्यांना उत आल्याने तरण पीढीसह वयस्कर मंडळी देखील ह्या लोभामध्ये बळी पडत असल्याचे समजते. यामुळे या परिसरात जुगार अड्डे सट्टा मटका अवैध धंदे दारू,जुगार हे व्यवसाय बिनधास्त राजरोसपणे सुरु असल्याची चर्चा आता हळूहळू जळगाव जिल्ह्यात देखील चर्चा वाढु लागली आहे. या सट्टा मटका दारू जुगाराला मोलाचे सहकार्य संबंधित पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनांकडुन होत असल्याचे तालुकासह जिल्ह्यातील जनतेचे़ म्हणणे आहे असे जनतेकडुन ऐकण्यास मिळत आहे.तेरी भी चुप और मेरी भी चुप अशी परिस्थिती असल्या कारणाने दिवसेंदिवस अवैध धंद्यावाल्यांसह पोलिस प्रशासनातील काही पोलिस देखील ह्या अवैध धंद्यावाल्यांशी भेटीगाठी करतांना नजरेस पडत आहेत अवैध धंद्यांवाल्यांशी भेटीगाठी कशासाठी हा प्रश्न मात्र सध्या स्थितीत परिसरातील जनतेला वारंवार त्रास देत आहे या जुगारांच्या लोभामध्ये तरुण पिढी सह वयस्कर मंडळी व जेष्ठ नागरिक सध्याच्या स्थितीत व्यसनाधिन झाल्याने यांच्या मुलाबाळांचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.आणि आमच्या परिवारांना जुगारांमुळे उद्धव करुन टाका तेव्हाच जुगार अड्डे अवैध धंदे बंद करा अशी परिसरातील जनतेच्या कुटुंबियांकडुन पोलिस प्रशासनाविषयी संतप्त प्रतिक्रिया जोर धरू लागल्या आहेत या जुगाराच्या व दारूच्या आहारी गेल्याने ह्या तरुण पीढीसह अनेकांचे संसार उद्धवस्त होतांना दिसत आहे .तरीही पोलिस प्रशासनाकडुन जुगार अड्डे अवैध धंद्यांबाबत ठोस पाऊले उचलुन कारवाई करण्याची भुमिका मात्र अजुन गुलदस्त्यात आहे.या सट्टा मटका, पत्ता जुगाराला व अवैध धंद्यांना भली मोठी मदत आणि चालना देण्याचे काम हे पोलिस प्रशासनाकडुन होत असल्याचे जिल्ह्यातील परिसरातील जनतेकडुन बोलले जात आहे. असल्याची परिसरातील जनतेकडुन जोरदार चर्चा सुरू आहे .या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावाल्यांवर अवैध धंदे वाल्यांवर जिल्हा पोलीस प्रशासन कार्यवाही करेल का ? असा सवाल मात्र परिसरातील जनतेला आता खुप त्रास देऊ लागला आहे ..जेणे करून तरुण पिढी व वयस्कर लोक हे लोभापोटी बळी पडू नये. म्हणून तात्काळ या प्रकारांकडे जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांनी गांभीर्याने लक्ष देऊन, जुगार अड्डे चालवणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे जुगार अड्डे व दारू मध्ये व्यसनाधिन झालेल्या सर्वसामान्य जनतेचे जीवन वाचवावे अशी रास्त स्वरुपाची मागणी जिल्ह्यातील जनतेने जिल्हा पोलिस प्रशासनाकडे केली आहे आणि ह्या संबंधीत सुरू असलेले जुगार अड्डे सट्टा मटका पिढ्या अवैध धंदे, कायमस्वरूपी बंद करावे..अशी रास्त स्वरुपाची मागणी वरीष्ठ नागरिकांसह परिसरातील जनतेने पोलिस प्रशासनाकडे केली आहे.. जर पोलिस प्रशासनाने जुगार अड्डे, अवैध धंदे बंद केले नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे जिल्ह्यातील जनतेचे जिल्हा पोलिस प्रशासनाला आवाहन करण्यात आले आहे

सावदा फैजपूर परिसरासह जिल्ह्यात अवैध धंदे आणि जुगार अड्यांचा महापुर. पोलिस प्रशासनाची बघ्याची भुमिका अनेकांचे संसार ह्या जुगारांच्या महापुरात वाहुन जाण्याची दाट शक्यता                                                            
Previous Post Next Post